आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वेटरचा खून; एक जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावतीवरून बडनेरा जाणाऱ्या जुन्या बायपास वरील अॅनेक्स बार अॅन्ड रेस्टॉरेंन्टवर आलेल्या दोन ग्राहकांनी रेस्टॉरेन्टमधील वेटर हॉटेलचालकासोबत वाद घातला. यावेळी हॉटेलमध्ये काम करून स्पर्धा परिक्षेची तयारी करून नोकरीचे स्वप्न रंगवणाऱ्या एका २५ वर्षीय वेटरच्या छातीत दारूड्या ग्राहकाने चाकू मारला, यामध्ये त्या वेटरचा मृत्यू झाला तर अन्य एक वेटर गंभीर जखमी झाला असून तो नागपूरात उपचार घेत आहे. हा थरारक घटनाक्रम शनिवारी (दि. २४) मध्यरात्री वाजताच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून मुख्य मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.

सतिश राम पालवे (३०, रा. जेवडनगर, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. अजीत रमेश नाईक (२५, रा. फुलआमला, ह. मु. बडनेरा) असे खून झालेल्या वेटरचे तर याचवेळी झालेल्या चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या वेटरचे नाव संदीप रंगरावजी पाटील (३०) आहे. जुन्या बायपासवरील बार अॅन्ड रेस्टॉरेन्ट अॅनेक्सवर शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास सतीश त्याच्यासोबत आणखी एक असे दोघे जण आले. यावेळी रेस्टॉरेन्ट बंद झाले होते मात्र आतमध्ये आवराआवर सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सतीश त्याच्या साथीदाराने जेवण करायचे, दारू प्यायची आहे, असा हट्ट धरला. मात्र आता रस्टॉरेन्टची स्वयंपाक खोली बंद झाली असून जेवण मिळणार नाही तसेच दारूसद्धा मिळणार नाही, असे वेटरने सांगितले. मात्र हे दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी वेटरला शिवीगाळ सुरू केली, त्यावेळी त्या हॉटेलचे चालक विजय पुरणलाल खत्री हे त्याठिकाणी आले त्यांनी दोघांनाही समजावले, आता जेवण संपले आहे, मात्र दारूची बॉटल त्यांना देण्यात आली. पण ते जेवण करणारच या हट्टावर ठाम होते. त्यावेळी खत्री यांनी वाद होवू नये म्हणून स्वत:साठी आलेल्या जेवणातील जेवण करण्यास त्यांना दिले मात्र त्यांनी ते नको सांगितले. त्या दोघांकडून शिवीगाळ सुरूच होती. यामुळे रेस्टॉरेन्टमधील वेटरने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेटर या दोघांत हाणामारी झाली. हॉटेलमधील चार वेटर या दोघांना हॉटेलच्या बाहेर काढत हाेते, जबरदस्तीने त्यांनी बाहेर काढले. बाहेर जाताच सतिश पालवेसोबतच्या सहकाऱ्याने दुचाकीतील चाकू काढून वेटरवर वार केले. यामध्ये अजीतच्या छाती संदीपच्या पाठीवर चाकूचे घाव लागले. यावेळी हॉटेलमधील इतर वेटर चालक बाहेर गेले. दरम्यान त्याचवेळी गस्तीवरील गुन्हे शाखेचे पथक त्याच मार्गाने जात होते. गोंधळ दिसल्यामुळे ते थांबले, त्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, त्यावेळी घटनास्थळावरील सतीश पालवेला पोलिसांनी पकडले, त्याचा मित्र मात्र पसार झाला.त्यानंतर दोन्ही जखमींना इर्विनमध्ये आणले, तपासणी अंती डॉक्टरांनी अजीत नाईकला मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या संदीपला उपचारासाठी नागपूरला रवाना केले आहे. घटनेची माहीती मिळाल्यानंतर बडनेरा राजापेठ पोलिस घटनास्थळी पोहचले होते. सदर घटनास्थळ हे बडनेरा पेालिसांच्या हद्दीत येते. या प्रकरणात विजय खत्री यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजीत नाईक हा फुलआमला येथील रहीवासी होता. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी त्याने सुरू केली होती. बडनेरा येथे एका मित्रासमवेत भाड्याने खोली करून राहायचा. तसेच रात्रीच्या वेळी पार्टटाईम म्हणून ‘अॅनेक्स’ बार अॅन्ड रेस्टॉरेन्टवर काम करायचा. मात्र शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा अजीत बळी पडला. नोकरीचे स्वप्न उराशी बागळून प्रयत्न करणाऱ्या अजीतला नाहक आपला जीव गमववा लागला आहे. दरम्यान या प्रकरामुळे संतप्त झालेल्या अजीतच्या नातेवाईकांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी रविवारी पोलिसांकडे केली आहे.
विजयपुरणलाल खत्री हे त्याठिकाणी आले त्यांनी दोघांनाही समजावले, आता जेवण संपले आहे, मात्र दारूची बॉटल त्यांना देण्यात आली. पण ते जेवण करणारच या हट्टावर ठाम होते. त्यावेळी खत्री यांनी वाद होवू नये म्हणून स्वत:साठी आलेल्या जेवणातील जेवण करण्यास त्यांना दिले मात्र त्यांनी ते नको सांगितले. त्या दोघांकडून शिवीगाळ सुरूच होती. यामुळे रेस्टॉरेन्टमधील वेटरने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वेटर या दोघांमध्ये हाणामारी झाली. हॉटेलमधील चार वेटर या दोघांना हॉटेलच्या बाहेर काढत हाेते, जबरदस्तीने त्यांनी बाहेर काढले. बाहेर जाताच सतिश पालवेसोबत असलेल्या सहकाऱ्याने दुचाकीमध्ये असलेला चाकू काढला आणि चाकूव्दारे त्याठिकाणी असलेल्या वेटरवर सपासप वार सुरू केले. यामध्ये अजीतच्या छाती संदीपच्या पाठीवर चाकूचे घाव लागले. यावेळी हॉटेलमधील इतर वेटर चालक धावतच बाहेर गेले. दरम्यान त्याचवेळी रात्रगस्तीवर असलेले गुन्हे शाखेचे पथक त्याच मार्गाने जात होते. गोंधळ दिसल्यामुळे ते थांबले, त्यावेळी सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला, त्यावेळी घटनास्थळावर असलेल्या सतिश पालवेला पोलिसांनी पकडले, त्याचा मित्र मात्र घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेतील दोन्ही जखमींना इर्विनमध्ये आणले, तपासणी अंती डॉक्टरांनी अजीत नाईकला मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या संदीपला उपचारासाठी नागपूरला रवाना केले आहे. घटनेची माहीती मिळाल्यानंतर बडनेरा राजापेठ पोलिस घटनास्थळी पोहचले होते. सदर घटनास्थळ हे बडनेरा पेालिसांच्या हद्दीत येते. या प्रकरणात विजय खत्री यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजीत नाईक हा फुलआमला येथील रहीवासी होता. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परिक्षेची तयारी त्याने सुरू केली होती. बडनेरा येथे एका मित्रासमवेत भाड्याने खोली करून राहायचा. तसेच रात्रीच्या वेळी पार्टटाईम म्हणून ‘अॅनेक्स’ बार अॅन्ड रेस्टॉरेन्टवर काम करायचा. मात्र शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा अजीत बळी पडला. नोकरीचे स्वप्न उराशी बागळून प्रयत्न करणाऱ्या अजीतला नाहक आपला जीव गमववा लागला आहे. दरम्यान या प्रकरामुळे संतप्त झालेल्या अजीतच्या नातेवाईकांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी रविवारी (दि. २५) पोलिसांकडे केली आहे.
सतिशकडून होतेय पोलिसांची दिशाभूल
घटनास्थळावरून सतिशला ताब्यात घेतल्यानंतर त्याची विचारपुस केली. सहकारी कोण? त्याचे नाव काय? यावर तो वेगळे उत्तर देतो, ‘अॅनेक्स’मधील सीसीटीव्हीच्या फुटेजमध्येही आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नाही. दरम्यान पोलिसांनी संशयावरून रविवारी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र रविवारी पोलिस मुख्य मारेकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत.
एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
सतिश पालवेलार विवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याने सहकाऱ्याचे खरे नाव सांगितले नाही. मात्र आमचा शोध सुरू आहे. आम्ही पाच जणांना संशयाच्या आधारावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते मात्र अद्याप त्यांचा सहभाग आढळला नाही. दिलीप पाटील, ठाणेदार, बडनेरा.
बातम्या आणखी आहेत...