आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनपालाकडून महिला मजुरांची पिळवणूक, मंदर येथील वनपालाविरोधात कारवाईची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - येथून जवळच असलेल्या मंदर येथे वनविभागाच्या अधिनस्त येत असलेल्या रोपवाटिकेत वनपालाकडून महिला मजुरांची पिळवणूक होत असल्याचा प्रकार समोर आल्याने वन विभागात खळबळ उडाली असून बुधवारी दुपारी २.३० वाजता महिला मजुरांनी गुरुदेव सेनेचे मुख्य संयोजक दिलीप भोयर यांचे नेतृत्वात सहायक उपवन संरक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत वनपालावर कारवाईची मागणी केली. 
 
मागील दोन वर्षांपासून मंदर येथील निलगिरी वनालगत एक रोपवाटिका निर्माण करण्याचे काम वनविभागामार्फत सुरू असल्याने या रोप वाटिकेत मंदर येथील मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला. शेकडो महिलांना वाटिकेत रोहयोतून काम मिळून संसारास मदत होत आहे . परंतु रोप वाटिकेचे व्यवस्थापन बघत असलेले वनपाल विजय पोटे हे अमानुष पद्धतीची वागणूक देत महिलांना अश्लील भाषेत बोलणे, नशा पानी करून रोपवाटिकेत येऊन महिलांना शिवीगाळ करणे, तक्रार केल्यास तुम्हाला कामावरून काढण्याची धमकी देणे, या प्रकारामुळे महिला त्रस्त झाल्या. अखेर या सर्व पीडित महिलांनी मंदर येथीलच श्री गुरूदेव सेनेचे तालुका संघटक गणेश खरवडे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली असता त्यांनी तेथील सामाजिक कार्यकर्ते राजू मोहितकर, बाबाराव बोढे यांचे नेतृत्वात सप्टेंबर रोजी पांढरकवडा येथे जाऊन उपवन संरक्षकाकडे वनपाल पोटे यांची तक्रार केली. 
 
बुधवारी प्रत्यक्ष अधिकारी हे वणी येथे येऊन चौकशी करणार होते. परंतु ते आल्याने सर्व मजूर महिलांनी सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता वणी येथील सहायक राजकुमार पटवारी यांच्या कार्यालयावर धडक दिली. या वेळी श्री गुरूदेव सेनेचे मुख्य संयोजक दिलीप भोयर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत संबंधित अधिकाऱ्यांवर चार दिवसांत कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई केल्यास यवतमाळ येथे महिलांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला. या वेळी अनेक महिला मजूर पुरुष उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...