आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार धरत मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत दिली तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूर रेल्वे - शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात येथील शेतकरी संघटना सुकाणू समितीच्या वतीने शुक्रवारी ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांच्याकडे लेखी तक्रार केली. 
 
शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करू तसेच डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सर्व शेतीमालाचे बाजार भाव उत्पादन खर्च ५० टक्के नफा ठरवू आणि शासकीय खरेदी करू, असे सरकारने निवडणुकीत वचन दिले होते. मात्र गेल्या तीन वर्षांपासून भाजप सरकारने याबाबत कोणतीही कृती केली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाली. या आत्महत्यांना मुख्यमंत्री जबाबदार अाहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरुद्ध आयपीसी कलम ३०२, ३०६ फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. तत्पूर्वी शुक्रवारी सुकाणू समिती, चांदूर रेल्वेचे सर्व सदस्य शेतकऱ्यांनी सिनेमा चौकातून रॅली काढली. हा मोर्चा पोलिस ठाण्यासमोर आल्यावर लेखी तक्रार दिली. त्यानंतर देविदास राऊत, विनोद जोशी, नितीन गवळी, विलास आसोले, प्रफुल्ल ढगे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक रोडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन सागर दुर्योधन यांनी केले. 
 
या वेळी किसान सभेचे अध्यक्ष देविदास राऊत, भाकपचे विनोद जोशी, आपचे नितीन गवळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विलासराव आसोलेंसह मेहमूद हुसेन, राजाभाऊ भैसे, प्रहार शेतकरी संघटनेचे सौरभ इंगळे, भीमराव खलाटे, अरविंद भैसे, भीमराव बेराड, विनोद लहाने, प्रभाकरराव कडू, गजानन भैसे, पंकज गुडधे, प्रभुराज इंगळे, प्रफुल्ल बनसोड, गणेश तुमरे, सचिन इमले, भीमराव दांडेकर, विक्रम तायडे, कृष्णकुमार पाटील, मनोज जिरापुरे, संतोष मेश्राम, प्रमोद झाडे शेतकरी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...