आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या झोनवर करता येणार ध्वनी प्रदूषणाची तक्रार, प्रशासनाने आरंभ केली तक्रार निवारण प्रणाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दिवाळीदरम्यान ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून महापालिकेच्या पाच ही झोन कार्यालयात तक्रार करण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. झोन स्तरावर गठीत केलेल्या निवारण कक्षाकडे ध्वनी प्रदूषणाबाबत नागरिकांना तक्रार करता येणार आहे.
 
महापालिका क्षेत्रात सण उत्सव कालावधीत ध्वनी प्रदूषण नियंत्रणाकरिता नागरिकांनी ध्वनी प्रदूषण संदर्भात तक्रार करण्यासाठी टोल फ्री क्रमांक, एसएमएस तसेच ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. ज्या कोणत्या परिसरात ध्वनी प्रदूषण होत असल्याचे दिसत आहे. त्याची तातडीने तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. सहायक आयुक्तांच्या नियंत्रणाखाली नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. या पथकामध्ये झोन मधील उपअभियंता, अभियंता, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यांचा समावेश करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...