आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Agitation In Yavatmal Against Government

राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसचा "बैलबंडी मोर्चा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दारव्हा- लबाडाचआवतन जेवल्याशिवाय खरे नाही, या उक्तीचा आधार शासनाने घेतला. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा विडा उचलला आहे. यवतमाळ जिल्हा दृष्काळाच्या यादीमधून हद्दपार होण्याला पालकमंत्री संजय राठोड हेच जबाबदार आहेत. त्यांनी त्यांच्या खात्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी शासनाला वेठीस धरू, असे मत आमदार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. दारव्हा येथे आज, दि. १० फेब्रुवारी रोजी काँग्रेसने बैलबंडी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले त्यावेळी ते बोलत होते.
दारव्हा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मोर्चाचे आयोजन केले होते. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामधून मोर्चाला सुरुवात झाली. आमदार माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात माजी राज्यमंत्री संजय देशमुख, जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, राहुल ठाकरे, सुरेश गावंडे, विजया सांगळे, शब्बीर बेग, अशोक बोबडे, अरूण राऊत आदी मान्यवरांनी बैलबंडीमध्ये बसवुन ढोलताशाच्या गजरात मोर्चा काढला. गोळीबार चौकातून सरळ मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारवर सडकून टिका केली.

यावेळी मोर्चाला संबोधीत करताना शेतकऱ्यांना घाबरण्याचा सल्ला ठाकरे यांनी दिला. तसेच शेतकरी बांधव, शेतमजुराचे कामे काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे. कामे करत असताना अधिकारी वर्गांनी पालकमंत्र्यांच्या दबावाखाली वेळ लावला, तर मला फोन करा. मी हजर होईल, एसडीओ, तहसील, ठाणेदार, बीडीओंना इशाराच संजय देशमुख यांनी दिला. यावेळी मोर्चात बोलताना देवानंद पवार यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यात का दिरंगाई करत आहे, याचा पाढाच वाचून दाखवला. शेतकरी संघटनेचे नेते सुरेश गावंडे यांनी तर पालकमंत्र्यांच्या विरोधात बिगुल फुंकला. संजय राठोड यांचा मांडीला मांडी लावून आपण अनेक आंदोलने केले. त्यांची जाण आज ते भूलले आहे. सत्तेच्या आहारी गेल्यामुळे त्यांना मतदार संघातील शेतकरी शेतमजुरांचे काहीच देणे, घेणे नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांचे मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी चेतन गिरोसे यांना दिले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, जिल्हा परिषद सदस्य पंढरी सिहे, प्रकाश नवरंगे, सुभाष पवार, संतोष चव्हाण यांनी परिश्रम घेतले.