आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील निधी ग्रामीण भागात खर्च केला; ऊर्जामंत्री बावनकुळे, रणजित पाटलांवर काँग्रेसचे अाराेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- नागपूर सुधार प्रन्यासने शहरात खर्च करायचा २३४ कोटींचा निधी ग्रामीण भागात असलेल्या कोरडी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी देण्यात आला असून पालकमंत्री व राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दबावाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप  काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केला. या प्रकरणाच्या चाैकशीची मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचेही ते म्हणाले.


अामदार वडेट्टीवार म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यास ही संस्था शहराच्या विकासासाठी आहे. मात्र, प्रन्यासने ग्रामीण भागातील कोराडी येथील महालक्ष्मी मंदिराच्या सुशोभिकरणासाठी २३४ कोटी रुपयांचा निधी दिला. हा निधी ग्रामीण भागात कसा काय वळता करता येतो? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. 

 

पुढील स्‍लाईडवर पाहा, राज्यमंत्र्यांनी काेर्टाचे अादेश डावलून दंड केला माफ...

 

बातम्या आणखी आहेत...