आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 पं. स. मध्ये 31 जागा घेत अमरावतीमध्‍ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, 23 जागा घेत भाजपची दुसऱ्या स्थानावर मुसंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील १० पंचायत समिती निवडणुकीत ३१ जागा घेत काँग्रेसने वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले तेथेच भाजपनेही दमदार मुसंडी मारत २३ जागा घेत गत  निवडणुकीपेक्षा यंदा कामगिरीत सुधारणा केली. यंदा काही बंडखोर व असंतुष्टांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी एकला चलो रे म्हणत अपक्ष  निवडणूक लढवली. त्यामुळे अपक्ष १४ जागा घेत तिसऱ्या स्थानावर आहेत.  
 
चिखलदरा, चांदुर बाजार, मोर्शी, वरुड, अमरावती, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, भातकुली आणि नांदगाव खंडेश्वर या दहा पंचायत समितीच्या  निवडणुकीत शिवसेनेनेही १० जागा घेत समाधानकारक कामगिरी केली तेथेच युवा स्वाभिमान पक्षाने चार तर बसपाने दोन जागा मिळवला. सर्वाधिक नुकसान राष्ट्रवादी काँग्रेसला सहन करावे लागले. त्यांना केवळ चारच जागांवर यश मिळवता आले. भाजपने यंदा पंस  निवडणुकीत चांगलाच जोर लावत मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने भाजपला अपेक्षित लाभ मिळाला नाही. तेथेच काँग्रेसनेही पूर्ण क्षमतेने आपल्या जागा वाचवण्याची खटपट केली ती यशस्वीही ठरली. सेनेला दुहेरी आकड्यापर्यंत मजल मारता आली. युवा स्वाभिमानने चार जागांवर यश मिळवले तर बहुजन समाजवादी पार्टीने दोन जागा बळकावल्या.
 
बातम्या आणखी आहेत...