आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भ काँग्रेसमध्येच \'आक्रोश\', वड्डेटीवर- पुगलिया गटाचे वेगवेगळे मेळावे, चव्हाणविरोधी एकवटले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्रपूरात झालेल्या जनआक्रोश मेळाव्याला उपस्थित काँग्रेस नेते... - Divya Marathi
चंद्रपूरात झालेल्या जनआक्रोश मेळाव्याला उपस्थित काँग्रेस नेते...
नागपूर- राज्यातील भाजप सरकारविरोधात काँग्रेस पक्षाने काढलेल्या जन आक्रोश मेळाव्याला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, सोबतच विदर्भात काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे. आज चंद्रपूरात झालेल्या जनआक्रोश मेळाव्याला अशोक चव्हाण विरोधकांनी दांडी मारली. या गटाचे नेतृत्त्व नरेश पुगलिया यांनी केली. चंद्रपूरात झालेल्या आजच्या मेळाव्याचे आयोजन आमदार विजय वड्डेटीवार यांनी केले. तर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा विभागीय शेतकरी मेळावा भरवला.
 
जनतेचा आक्रोश दिसला-
 
काँग्रेसच्या आजच्या जनआक्रोश मेळाव्याला जनतेने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. मागील तीन वर्षात केंद्र व राज्य सरकारने जनतेची दिशाभूल केली. नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली. महागाईने कळस गाठला. या परिस्थितीत जनतेला जगणे महाग आणि मरण स्वस्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील जनता या सरकारला विटली आहे, त्यांच्या मनात कमालीचा आक्रोश दिसत आहे असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, विजय वड्डेटीवार आणि नरेश पुगलिया गटाची पत्रकबाजी...
बातम्या आणखी आहेत...