आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ घालून काँग्रेस नेते दिल्लीकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या अामदारांनी विधिमंडळात गाेंधळ घालून कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींचा वाढदिवस असल्याने काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीला जायचे होते, त्यामुळे सरकार शेतकरी प्रश्नावर चर्चेस तयार असतानाही ‘अाधी कर्जमाफीची घाेषणा करा’ अशी घाेषणाबाजी करत काँग्रेसने सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेतील कामकाज बंद पाडले अन‌् तातडीने दिल्ली गाठली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मात्र महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दुष्काळ मदतीवरून बोलण्याची संधी देत काँग्रेसवर कुरघाेडी केली.

बुधवारी विधानसभेचे कामकाज सुरू हाेताच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तरे पुकारली, मात्र काँग्रेस आमदारांनी लगेचच कर्जमाफी देण्याची घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘सरकारने चर्चा न करता कर्जमाफीची घोषणा करावी’ अशी मागणी केली. ‘अाधी प्रश्नाेत्तरे पूर्ण करू,’ असे अध्यक्षांनी सुचवले; मात्र काँग्रेस अामदारांची घोषणाबाजी सुरूच राहिली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चा घ्यावी, अशी मागणी केली.

प्रश्नकर्त्यांचेच माैन : अमरावती, वर्धा व वाशीम जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबत एक प्रश्न होता. मात्र, प्रश्नकर्त्या एकाही सदस्याने ताे विचारला नाही. त्यावर जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीबाबत सरकार काय करत आहे? असा प्रश्न केला. तेव्हा खडसे यांनी सरकारने कोणकोणत्या उपाययोजना केल्या याचा पाढाच वाचला आणि अाघाडी सरकारच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आल्याचे सांगितले.सांगत, आमच्या धोरणामुळे शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील असा दावा केला. तरीही गोंधळ सुरु राहिल्याने तीन वेळा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.

‘विरोधी पक्षात असताना एकनाथ खडसे कसे वागायचे याचा त्यांनी विचार करावा. तूरडाळीचे भाव सरकार कमी करू शकत होते परंतु सरकारने ते केले नाहीत. त्यामुळे सरकारने आता चर्चा करण्यात वेळ घालवू नये प्रश्नोत्तराचा तास थांबवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा,’ असे म्हटले. यावर खडसे म्हणाले, ‘सभागृह चर्चेचे व्यासपीठ आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमचीही इच्छा आहे. आम्ही कालही चर्चेला तयार होतो आणि आजही आहोत. परंतु विरोधकांना चर्चेत रस नाही त्यांना केवळ राजकारण करायचे आहे,’ या शब्दात विरोधकांवर हल्लाबोल केला. खडसेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरु केली. कोणत्याही परिस्थितीत सरकारला शेतकऱ्यांच्या मदतीबाबत बोलू द्यायचे नाही असा पवित्रा काँग्रेस आमदारांचा होता.
विधान परिषदेतही पुन्हा ‘कर्जमाफी’ गाजली !
कर्जमाफी िमळालीच पाहिजे, अशा घोषणा देत िवधान परिषदेत बुधवारी िवरोधकांनी प्रवेश केला. वर्षभरापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचे सावकारांकडील १ कोटी ४ लाख कर्ज फेडण्याची घोषणा केली. पण ते फेडले तर गेले नाही, पण कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांवर सावकारांनाच िकडन्या िवकण्याची वेळ आली. आत्महत्यांचा वाढलेला आकडाही या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दाखवतो, अशा शब्दांत िवरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला फटकारले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री िगरीष बापट यांनी सरकार चर्चेस तयार असल्याचे सांगितले, पण मुंडे तसेच माणिकराव ठाकरे यांनी कर्जमाफीची मागणी रेटून धरली. या गाेंधळातच कामकाज तहकूब करावे लागले.