आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमाेद शेंडे यांना अखेरचा निराेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद भाऊसाहेब शेंडे (वय ७७) यांचे शनिवारी नागपूर येथे रात्री निधन झाले. रविवारी वर्धा येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी वर्षा, रवी, शेखर व आकाश ही तीन मुले व आप्त परिवार आहे.

प्रमोद शेंडे वर्धातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा िवधानसभेवर निवडून गेले. १९८० मध्ये वसंत साठे यांच्या नेतृत्वात ते काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. १९९०चा अपवाद वगळता २००९ पर्यत ते आमदार होते. १९९९ ते २००९ या काळात ते िवधानसभेचे उपाध्यक्ष होते. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात ते कृषिमंत्रीही होते.