आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे खासदार राजीव सातव गडकरी वाड्यावर; मतदारसंघातील समस्यांबाबत भेटल्याचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- हिंगोली काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. खासदार सातव यांच्या वाड्यावरील भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. सातव यांनी मात्र मतदारसंघातील समस्यांबाबत गडकरी यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे.   

सूत्रांनुसार,  दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास  सातव हे निवडक सहकाऱ्यांसह गडकरी वाड्यावर पोहोचले. गडकरी आणि सातव यांच्यात किमान वीस मिनिटे चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. या चर्चेचा तपशील कळू शकला नाही. मात्र, सातव यांनी मतदारसंघातील समस्यांबाबत गडकरी यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...