आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी शेतकऱ्यांना दिलेले आश्‍वासन पाळले नाही, काँग्रेस जतंरमंतरवर करणार आंदोलन: शिवाजीराव मोघे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ (आर्णी) - 2014 लोकसभा निवडणुकीदरम्‍यान तेव्‍हाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आर्णी तालुक्‍यात आले होते. त्‍यावेळी शेतकऱ्यांशी 'चाय पे चर्चा' करताना मोदींनी शेतकऱ्यांना अनेक आश्‍वासने दिले होते. मात्र यापैकी एकही आश्‍वासन पंतप्रधान मोदींनी पाळले नाही. त्‍यांना त्‍यांच्‍या आश्‍वासनांची आठवण करुन देण्‍यासाठी येत्‍या 18 मेला काँग्रेस जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते तसेच राज्‍याचे माजी सामाजिक न्‍याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रकार परिषदेमध्‍ये दिली.   
 
संघर्ष यात्रेचा या आंदोलनासोबत संबंध नाही
एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष राज्यभर फिरून शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी घेऊन सघर्ष यात्रा काढत आहे. तरी सुध्दा सरकारला घाम फुटत नाही. त्यामुळे संघर्ष याञेला अपयश आल्यामुळे कदाचित मोघे दाभडी वरून दिल्लीला जाऊन आंदोलन करत असल्याची चर्चा सुरू आहे.
 
मोदींना जाब विचारणार
उन्हाळ्यात भल्या-भल्यांना घाम फुटतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पतप्रंधान नरेंद्र मोदी यांना जाब विचारून त्यांना घाम फोडल्या शिवाय बसणार नाही. आमच्या मागण्या संपूर्ण देशातील शेतकर्यांसाठी असून शेतकर्यांना दिलेले आश्वासन पुर्ण करा हिच एकमेव मागणी असणार आहे.
 
शनिवारी संध्‍याकाळी आर्णी येथे पत्रकार परिषदेमध्‍ये ते बोलत होते. यावेळी त्‍यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत शेतकऱ्यांच्‍या हिताचे निर्णय घेण्‍यासाठी त्‍यांना भाग पाडू असे सांगितले.   
बातम्या आणखी आहेत...