आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षली हल्ल्यात हवालदाराचा मृत्यू, गडचिराेलीत अांबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात गाेळीबार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - गडचिरोलीतील छल्लेवाडा (ता. अहेरी) येथे गुरुवारी आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यात अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम यांचे अंगरक्षक, पाेलिस हवालदार नानाजी नागोसे (४५) यांचा मृत्यू झाला.

आत्रामांचे भाषण सुरू असताना नागोसे पाणी पिण्यासाठी गेले असता नक्षलींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. प्रत्यक्षदर्शींनुसार, नक्षलवाद्यांची संख्या चार ते पाचच्या आसपास होती. नागोसे यांची छाती व पोटात पाच गोळया घुसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. हवालदार पदावर कार्यरत असलेले नागोसे हे तीन वर्षांपासून आत्रामांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते.