आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रान्सपोर्टनगरात आग, पाच वाहने खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वलगावमार्गावर असलेल्या ट्रान्सपोर्टनगरमध्ये रविवारी (दि. ११) पहाटे अचानकपणे आग लागून या ठिकाणी विक्री, दुरूस्तीसाठी आलेले पाच वाहन जळून खाक झाले. यामध्ये एक ट्रक, दोन जीप, एक ओमनी अन्य एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे. कचरा पेटल्यामुळे ही आग लाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ट्रान्सपोर्ट नगरमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहन उभे असतात. दरम्यान रविवारी पहाटे ४.३० ते वाजताच्या सुमारास अचानकपणे या ठिकाणी उभ्या असलेल्या एक ट्रक, दोन जीप (क्रमांक एच. एच. २९ एम ३३१७ आणि एम. एच. २७ पी ५५१८), ओमनी क्रमांक ( एम. एच. १४ / ६५३) अन्य एका वाहनाला आग लागली. पहाटेची वेळ असल्यामुळे आग लागल्याचे लवकर लक्षात आले नाही. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. नागरिकांना माहिती होईस्ताेवर पाचही वाहने राख झाली.

वाहनांच्या टायरने पेट घेतल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली एकमेकांच्या बाजूने उभे असलेले हे पाच वाहन जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले.
बातम्या आणखी आहेत...