आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटाच्या अश्लील पोस्टर्सवर नियंत्रण येणार; सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करण्याची सरकारची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- चित्रपटाच्या अश्लील पोस्टर्सवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलणार असून त्यासाठी सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करण्याची तयारी सरकारने नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या याचिकेवर दर्शवली आहे. देशाच्या चित्रपटांच्या अश्लील पोस्टर्समुळे नव्या पिढीवर होणाऱ्या वाईट परिणामांवर नागपुरातील सामाजिक कार्यकर्त्याने जनहित याचिका दाखल केली आहे.   


नागपुरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तेजिंदरसिंह रेणू यांनी ही याचिका दाखल केली आहे.त्यावर सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल करताना अश्लील पोस्टर्सवर नियंत्रणासाठी योग्य अशी यंत्रणा स्थापन करण्याची तरतूद केली जाणार असल्याचे केंद्र सरकारने शपथपत्रात स्पष्ट केले आहे. इतर जाहिरातींचे पोस्टर्स किंवा अन्य माध्यमांनाही फिल्म या व्याख्येत आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...