आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या आर्थिक सुधारणांना संघ परिवारातून तीव्र विरोध, देशव्यापी संपाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘भारतीय मजदूर संघाला विश्वासात न घेता केंद्रातील भाजप सरकारने कुठल्याही परिणामांची पर्वा करता आर्थिक सुधारणा लागू करण्याचा सपाटा लावलाय. त्या लागू करण्यापूर्वी किमान संघ परिवारात त्यांची चर्चा होणे अपेक्षित असताना भाजप अथवा सरकारमधील प्रतिनिधी मनमानी करत आहेत. संघ परिवार चालवण्याची जबाबदारी केवळ भारतीय मजदूर संघाची आहे काय?’ या शब्दांत भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बैद्यनाथ राय यांनी भाजप सरकारला कडक शब्दांत इशारा दिला अाहे.

केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक सुधारणांपायी अस्वस्थ झालेल्या भारतीय मजदूर संघाने नागपुरातच राष्ट्रीय कार्यकारिणीची गुप्त बैठक पार पाडली. या बैठकीत संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्या उपस्थितीतच मजदूर संघाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर तोंडसुख घेतले. त्याचप्रमाणे सरकारच्या विरोधात आंदोलनाचा कृती कार्यक्रमही जाहीर करून टाकला. या पार्श्वभूमीवर राय यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद...
प्रश्न : आर्थिक धोरणे लागू करताना संघ परिवारात किमान सहा महिन्यांतून एकदा संवादाचा निर्णय झाला होता?
राय : हाेय,सन २०१५ च्या प्रतिनिधीसभेत असा निर्णय झाला होता. त्यावर अर्थमंत्री जेटलींच्या नेतृत्वातील मंत्रिसमूहाशी दोन बैठका झाल्या; पण सरकार आम्हाला विश्वासात घेत नाही.
प्रश्न: नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक सुधारणांवर तुमची काय भूमिका आहे?
राय : जनतेवरहोणाऱ्या परिणामांची कुठलीही पर्वा करता रोज काही निर्णय घेतले जात आहेत. सर्वच सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक, संरक्षणासह काही महत्त्वाच्या क्षेत्रांत १०० टक्के विदेशी गुंतवणुकीचे निर्णय घातक ठरू शकतात. त्यात कामगारांसह देशाचेही हित नाही. त्यामुळे आम्ही नागपूर बैठकीत सरकारची कठोर निंदा केली. अाठ जुलैपासून देशपातळीवर आंदोलन करणार आहोत. सप्टेंबरमध्ये देशव्यापी संपाची योजना आहे.
प्रश्न: परिवारातच संघर्ष हाेताना दिसताेय?
राय : परिवारहा सर्वांना मिळून चालवावा लागतो. त्यात कुणा एकाला मनमानी करता येत नाही. संघ परिवार चालवण्याची जबाबदारी केवळ भारतीय मजदूर संघाची आहे काय? भाजप सरकारमधील लोकांचीही ती जबाबदारी आहे.
प्रश्न: संघ नेतृत्वाकडे तक्रार केली का?
राय : आमच्याबैठकीत संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे होते. आमच्या प्रस्तावांवर त्यांनीही सहमती दर्शवली. आम्ही सरकारशी बोलू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
प्रश्न: मजदूर संघ संघर्ष करणार काय?
राय : भविष्यातबैठक घ्यावीच लागणार आहे; पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात परिवारात आर्थिक समूहाची बैठक आहे. त्यात भाजपचे प्रतिनिधीही असतील. त्यातही चर्चा होईल. आम्ही आमचा कृती कार्यक्रम जाहीर केलेलाच आहे.
प्रश्न :तुम्ही परिवारालाच अल्टिमेटम देत आहात. भविष्यात बाहेर पडणार की काय?
राय : याहायपोथेटिकल प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. भविष्यात काय घडेल हे आताच कुणी कसे सांगू शकतो? बारीश आज आएगी, ये बता सकते क्या..!
प्रश्न : या आर्थिक सुधारणांबाबत नेमके कोण जास्त आग्रही आहेत?
राय : ‘पीएमओ’तीलकाही नोकरशहा. निर्णयाचे जनतेवर होणाऱ्या परिणामांची कुठलीही पर्वा करता ते सरकारची सर्वांचीच दिशाभूल करत आहेत. भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर घटविण्याचा प्रस्ताव त्यांच्यापैकीच एकाचा. विरोध करून तो हाणून पाडला. सरकार सामूहिक जबाबदारीने चालते, हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.
बातम्या आणखी आहेत...