आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्णी नगर पालिकेत बांधकाम सभापतीने केली तोडफोड, कर्मचारी ऐकत नसल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ -  आर्णी पालिकेतील कर्मचारी लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही, असा आरोप करत बांधकाम सभापतीनेच आर्णी नगर पालिकेत तोडफोड केली आहे. त्‍यामुळे काही दिवसांपासून पालीकेतील कर्मचारी लोकप्रतिनिधी यांचे ऐकत नसल्याचा वाद चव्हाट्यावर आला आहे. मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजता च्या सुमारास पालिकेतील बांधकाम सभापती लक्ष्मण पठाडे यांनी बांधकाम विभागातील खुर्च्यांची व संगणकची तोडफोड केल्याची घटना घडली.

बांधकाम विभागात लिपिक म्हणुन कार्यरत असलेले अन्सार बेग यांना दुपारी सभापती पठाडे यांनी रस्त्याच्या लोकेशनच्या कामासाठी कार्यालयात बोलवले होते. माञ, लिपीक कर्मचारी बेग हे तब्बल आडीच ते तीन तास उशीरा आले. आल्‍यानंतर कार्यालयात वाट पाहत बसून असलेल्या सभापती सोबत यांना  ते बाललेही नाही. त्‍यामुळे सभापती लक्ष्मण पठाडे यांनी कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड करित संताप व्यक्त केला. यामुळे पालिकेत गदारोळ निर्माण झाल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस अधिकारी सुध्दा आले होते.

कर्मचार्यांची दादागिरी सहन करणार नाही
जनतेचे काम करण्यासाठी लोकांनी मला पाठविले आहे. त्यामुळे जनतेचे काम करून घेणे हे माझे कर्तव्य आहे. पालिकेतील कर्मचारी लोकप्रतिनिधींचे ऐकत नसतील तर सामान्य जनतेचे काय? यापुढे कर्मचार्यांची दादागिरी कदापी खपवून घेणार नाही.
- लक्ष्मण पठाडे.बांधकाम सभापती

सभापती यांनी संयम बाळगाला हवा होता
नगर पालीकेतील विकासकामे हे सभागृहाने घेतलेल्या ठरावानुसार व उपलब्ध निधीनुसार केला जातो. त्यामुळे सभापती यांनी संयम न बाळगता पालिकेतील वस्तूंची नासधुस करणे हे निषेधार्ह आहे.
- निर्मला राशिनकर, मुख्याधिकारी
 
सभापती विरोधात पोलीसात तक्रार
पालीकेचे बांधकामं सभापती यांच्या विरोधात मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी पोलीसात तक्रार दिली असून सभापती विरोधात नगर पालीकेतील सामानाची नासधुस केल्या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
8 दिवसांपूर्वीही झाला होता वाद
आठ दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नगरसेवक निरंकुश चव्हाण यांनी मुख्याधिकारी वॉर्डामधील घनकचरा व नालेसफाई करण्यासंदर्भात पुढाकार घेत नाही प्रभागमधील घनकचरा पालिकेत आणून टाकला होता.
 
बातम्या आणखी आहेत...