आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होर्डींग हटविल्याने आर्णी नगर पालिकेमध्ये नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी- आर्णीनगर पालिकेचे तत्कालीन अध्यक्ष आरीज बेग यांच्या कार्यकाळात शहरातील मुख्य रस्त्यावर २०१६ मध्ये ५४ लाखा रूपयांचे हायमास्ट बसविण्यासंदर्भात घाई गडबडीने ठरावा घेण्यात आला होता. या कामाच्या ठरावाला तत्कालीन नगरसेवक जावेद सोलंकी, संजय देशमुख, शाहीना अनवर पठाण, गणेश हिरोळे यांनी विरोध केला होता. मात्र, तरीही त्या कामाचा ठराव घेतल्याने नगरसेवक गणेश हिरोळे यांनी पालिकेतील बांधकाम विभागाच्या खोलीत स्वतःला कोडून आंदोलन केले होते. आ. तोडसाम यांनीही पालिका प्रशासनाला सांगूनही काम थांबवण्यात आले नाही.

या कामाला सर्वांचा विरोध असतांना प्रशासनाने शहरात नविन ३२ पोल १२ मिटरचे तीन हायमास्ट आणि मिटरचे दोन हायमास्ट लाईट बसवून त्या कामाचे बिलही काढण्याचा प्रकार समोर आल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अनवर पठाण यांनी निकृष्ठ झालेल्या हायमास्ट लाईटवर मार्मिक शब्दात बॅनर काढून दि. ऑगस्ट रोजी रात्री लावले, हे बॅनर सकाळीच चुपचाप काढण्यास मुख्याधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले. मुख्यधिकारी यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी बॅनर सकाळीच हटविल्याची माहिती नगरसेवक अनवर पठाण यांना मिळाली त्यानंतर पठाण यांनी संबंधित कर्मचारीकडे बॅनर का हटविले अशी विचारांना केली. त्यामुळे कर्मचारी यांनी मुख्याधिकारी यांच्या आदेशावरून बॅनर हटविल्याचे सांगितले. घटनास्थळी प्रहारचे जिल्हाप्रमुख प्रमोद कुदळे कार्यकर्त्यांसह दाखल झाले.
 
विशेष म्हणजे नगरसेवक अनवर पठाण यांनी शहरात बॅनर लावत असल्या संदर्भात रितसर परवानगी घेतली होती. तरी सुध्दा त्यांनी लावलेले बॅनर हटविण्यात आल्याने प्रमोद कुदळे यांनी तिव्र शब्दात रोष व्यक्त केला. जो पर्यंत प्रशासन हटविलेले बॅनर बसविणार नाही तो पर्यंत पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा देत आंदोलन सुरू केले. एकातासानंतर उपाध्यक्ष राजीव विरखेडे आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना बोलवून काढलेले बॅनर पुन्हा लावत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...