आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या शिक्षण विभागामध्ये कोट्यवधी रुपयांचा झाला घोळ! आयुक्त करणार चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महापालिकेच्या शिक्षण विभागात कोट्यवधी रुपयांचा घोळ झाल्याची माहिती समोर आली आहे. नियमाबाहेर लाभ दिल्याने कोट्यवधीचा भूर्दंड महापालिकेवर बसला, तर खात्यातील २४ लाख रुपये गायब झाल्याची बाब उघड झाली. घाेळाची चौकशी आयुक्तांकडून केली जाणार आहे. तर शासन अनुदानाच्या एनओसीबाबत सभागृहाचे एकमत झाले.

अतिरिक्त शिक्षकांमुळे महापालिकेवर तब्बल कोटी रुपयांचा भूर्दंड पडला. अतिरिक्त शिक्षकांचे वेतन अनुदान शिक्षण उपसंचालकांकडून नाकारण्यात आले. मनपा शिक्षण विभागात २०१४-१५ च्या संच मान्यतेनुसार १८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. पद रिक्त नसताना शिक्षकांना शिक्षण विभागात रुजू करुन घेण्यात आले. शिक्षकांचे वेतन ५० टक्के मनपा

एनओसीचा नव्याने ठराव
स्थायीसमितीकडून सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेला अनुदान एनओसीचा विषय नामंजूर करण्यात आला. खासदार-आमदार यांच्या निधीतील विकास कामांना नाहरकत (एनओसी) प्रमाणपत्र देण्याचे मान्य करण्यात आले. शासनाकडून प्राप्त अनुदानातून विकास कामे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्याबाबत नव्याने ठराव करण्यात आला. महापालिकेला प्राप्त अनुदानाची कामे साबांविकडून शासनास करुन घ्यावयाची असेल तर त्याची एनओसी देण्याबाबत नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...