आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शौचालय गेले चोरीला, सरपंचानी अनुदान लाटल्‍याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा - सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छ भारत योजनेअंतर्गत कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य केले जाते. मात्र तिवसा तालुक्यातील भारवाडी ग्रामपंचायतीमधील सरपंच तत्कालीन सचिव यांनी या योजनेला सुरूंग लावून गरजूला शौचालयापासून वंचित ठेवत अनुदान मात्र लाटल्याचा आरोप उपसरपंच सचिन राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
 
तिवसा पंचायत समिती अंतर्गत भारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जुनी भारवाडी, नवीन भारवाडी चांदुर ढोरे, या तीन गावांचा समावेश आहे. या गावातील अनेक खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच गावातील रहिवाशी असलेल्या लक्ष्मी शेषराव कुसराम या महिलेला शासनाकडून शौचालय मंजूर झाले आहे. या महिलेला शौचालय देता एका अनोळखी महिलेचा शौचालया जवळील फोटो आणून कागदपत्रे खोट्या स्वाक्षरी करून १२ हजार रुपयांचे अनुदान सरपंच विद्या ठुनुकुले तत्कालीन सचिव शैला मळके यांनी लाटल्याचा आरोप राऊत राऊत यांनी केला. 
 
लक्ष्मी कुसराम ही महिला अद्यापही या योजनेपासून मात्र वंचितच आहे. या गंभीर प्रकाराची तक्रार उपसरपंच सचिन राऊत यांनी तिवसा पं. स.चे बीडीओ शीतल कदम, सीईआेंकडे केली असून, कारवाई केल्याचा आरोपही राऊत यांनी केला. लवकरात लवकर चौकशी करून संबंधित सचिव सरपंच यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणीही सचिन राऊत यांनी केली आहे. या प्रकाराविषयी सरपंच विद्या ठुनुकुले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो झाला नाही. 
 
चौकशी अंती याचा अहवाल येणार आहे 
संबंधित प्रकाराची चौकशी चालू आहे. लवकर अहवाल पुढे येईल. त्यानंतर कारवाई करण्यात येईल. 
- शीतल कदम, बीडीओ, तिवसा पं.स. 
 
सरपंच पती ठेकेदार 
सरपंच यांचे पतीच ठेकेदारी करत होते. त्यांनीच लोकांचे शौचालय बांधून दिले. तेच फोटो काढत होते. मला जे बांधकाम दाखवले, त्यानुसार पैसे काढले. - शैला मळके, तत्कालीन ग्राम सचिव. 
 
अनेक गैरप्रकार 
एकाव्यक्तीला दोन योजनांचा लाभ दिला. एका व्यक्तिचे मयत व्यक्तिचे नावे पैसे काढले सरपंच यांचे पती हस्तक्षेप करून सह्या मारतात. 
- सचिन राऊत, उपसरपंच. 
बातम्या आणखी आहेत...