आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: वर्षभरात 5 हजार बँक घोटाळे; 23,900 कोटींचा अपहार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत देशातील बँकांत एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा गैरव्यवहार झालेले तब्बल ५ हजार ७७ घोटाळे उघडकीस आले आहेत. या सर्व घोटाळ्यांत एकूण २३,९३३ कोटी ९१ लाख रुपयांच्या रकमेचा अपहार झाला आहे. रिझर्व्ह बँकेनेच आरटीआय अर्जाच्या उत्तरात ही माहिती दिली. या घोटाळ्यांत बँकांनी ४८० कर्मचाऱ्यांना सकृतदर्शी दोषी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

विशेष म्हणजे यात नागरी सहकारी बँकांमधील कथित घोटाळ्यांच्या माहितीचा समावेश नाही. नागपुरातील आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी अर्जात बँकांमधील घोटाळे, तोट्यातील बँका व तोट्याची एकूण रक्कम, नोटबंदीच्या काळात बँकांत जमा पाचशे व हजारच्या नोटांची माहिती मागवली होती.
 
नोटाबंदीची आकडेवारी : नोटबंदीच्या काळात महाराष्ट्रातील बँकांकडे पाचशे व एक हजाराच्या किती नोटा जमा करण्यात आल्या, याची माहिती गोळा करण्याचे काम अद्यापही सुरू आहे. या काळात जमा झालेल्या बनावट नोटांची माहिती उपलब्ध नसल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केल आहे.

नोटबंदीत राज्यात बँकांत ५०० व १००० च्या किती नोटा जमा झाल्याची माहिती गोळा करण्याचे काम अद्यापही सुरू असल्याचे आरबीआयने सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...