आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पणन महासंघ व सीसीआय केंद्रावर शून्य कापूस खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - खासगी व्यापाऱ्यांपेक्षा कमी भाव देणाऱ्या पणन महासंघ व सीसीअायकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र राज्यात दिसत अाहे. चालू हंगामासाठी महासंघाने १५ नाेव्हेंबरपासून खरेदी सुरु केली. त्यासाठी महासंघाने २५ तर सीसीअायने ५८ खरेदी केंद्रे सुरु केली हाेती. मात्र अाजवर या केंद्रावर एक क्विंटलही कापूस अालेला नाही. तर दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांनी ११९ केंद्रांवर १२,६८,९३२ क्विंटल खरेदी केली. कापसाचा हमीभाव ४१६० असला तरी व्यापारी ५२३० रूपये प्रति क्विंटल भाव देत असल्याने हा विराेधाभास दिसत अाहे.

२००७-०८ व २००८-०९ चा अपवाद वगळता सरकारी कापूस खरेदी नेहमी नोव्हेंबरमध्ये सुरू होते. या दोन हंगामात फक्त कापूस खरेदी आॅक्टोबरमध्ये सुरू केली होती. २०१०-११ आणि २०११-१२ या दोन हंगामात पणन महासंघाच्या केंद्रावर शून्य खरेदी होती. यंदाही तसेच चित्र अाहे. एकेकाळी कापूस खरेदीत असलेली पणन महासंघाची एकाधिकारशाही कधीच संपली असून खासगी व्यापाऱ्यांच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांनी यंदाही पणन महासंघाच्या कापूस खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
बातम्या आणखी आहेत...