आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायदे बाजारात कापूस तडकला; ५,६२५ रुपये भाव, जिल्ह्यात सरासरी दोनशे रुपयांनी वधारले प्रति क्विंटल दर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात कापसाचे दर वाढले असून स्थानिक बाजारपेठेतही कापसाचे शनिवारी सरासरी दोनशे रुपयांनी वधारले आहे. जिल्ह्यात परतवाडा येथील खासगी जिनींगवर सर्वाधिक ५६२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. दरम्यान, आगामी काळात कापसाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने (आयसीएसी) व्यक्त केले आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढल्याने वायदे बाजारातही आज कापसाच्या दरात तेजी आली. त्यामुळे वायदे बाजारात जानेवारी रोजी ७०.६५ सेंट प्रति पौंड असलेले कापसाचे दर शनिवारी आयसीई कॉटनवर ७४.२९ सेंट प्रति पौंडवर पोहचले. याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवरही दिसून आला. जिल्ह्यातील खासगी बाजारपेठेतही कापसाचे दर जानेवारीच्या तुलनेत सरासरी दोनशे रुपयांनी वाढले. जानेवारी रोजी जिल्ह्यातील खासगी बाजारात कापसाचे दर कमाल ५४०० रुपये होते. शनिवारी कापसाला सरासरी कमाल ५६२५ रुपये दर मिळाला. परंतु खर्चाच्या तुलनेत सध्या मिळणारे कापसाचे दर अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री थांबवली आहे. त्यामुळे खासगी जिनिंगवरही कापसाची आवक कमालीची मंदावली आहे. अमरावती बाजार समितीत सरासरी हजार क्विंटल होणारी कापसाची आवक शनिवारी दुपार पर्यंत १३३५ क्विंटल एवढी झाली. 

दर वाढण्याची शक्यता 
जिल्ह्यात यावर्षी कापसाचे सरासरी उत्पादन वाढले आहे. परंतु सध्या बाजारात मिळणारे दर खर्चाच्या तुलनेत अत्यल्प असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. त्यामुळे स्थानिक खासगी बाजारपेठेत कापसाची आवक कमालीची मंदावली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्याने सध्या दर तडकले आहेत. आगामी काळात कापसाचे दर अधिक वधारणार असल्याची शक्यता आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीने व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात जानेवारीला ७०.६५ सेंट प्रति पौंड, जानेवारी ७३.७८ सेंट प्रति पौंड असे दर इंडेक्स मंडीवर कायम होते. 

पावणेतीन लाख क्विंटलवर खरेदी : जिल्ह्यातसध्या कापसाचा हंगाम जोरात सुरू असून आतापर्यंत खासगी व्यापाऱ्यांनी सुमारे पावणे तीन लाख क्विंटलवर कापसाची खरेदी केली. जिल्ह्यातील एकूण असलेल्या कापसाच्या पेरणीक्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत केवळ सरासरी एकरी अर्धा क्विटंलच कापूस विक्रीसाठी बाजारात आला आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात लाख ५३ हजार ४८० एकरात कापसाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने कापसाचे उत्पादनही समाधानकारक होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या घरात सध्या दोन तृतीयांश कापूस आला अाहे.खासगी व्यापाऱ्यांच्या जिनिंगवर सध्या कापसाला सरासरी ५५०० ते ५६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. 

शेतकरी भाववाढीच्याप्रतीक्षेत असून, कापूस घरीच साठवून ठेवला आहे.त्यामुळे सध्या आवक कमालीची मंदावली आहे -राजू अग्रवाल, आर. आर.कॉटन, परतवाडा. 
बातम्या आणखी आहेत...