अमरावती - वायदेबाजार आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची तेजी कायम असून गुरुवारी (दि. १२) जिल्ह्यातील खासगी बाजारातही सरासरी शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ होऊन परतवाडा येथील जिनिंगमध्ये कापसाला सर्वाधिक कमाल ५७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्यामुळे दर दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील खासगी बाजारावर होऊनही गुरूवारी कापसाच्या दरात सरासरी शंभर ते दिडशे रुपयांनी वाढ झाली. अद्यापही खासगी बाजारात मर्यादीत कापसाची आवक होत आहे. त्यातुलनेत आज अमरावती येथील खासगी बाजारात कापसाची आवक वाढून आज ३६८० क्विंटल कापसाची आवक झाली. परतवाडा येथील आर. आर. जिनिंगवर कापसाला कमाल ५७५० तर किमान ५७२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. अमरावती येथे कमाल ५७०० तर किमान ५६००, अंजनगाव सुर्जी येथे कमाल ५७०० तर किमान ५६५०, धामणगाव रेल्वे येथे कमाल ५७३७ तर किमान ५५६०, दर्यापूर येथे सरासरी ५७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.