आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस कमाल 4700 रुपयांवर; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सुमारे ४३०० रुपयांपर्यंत घसरलेल्या कापसाचे दर सावरून सोमवारी कमाल ४७०० रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात वाढ झाली आहे.

 

जिल्ह्यात या वर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले असून कापसाचा दर्जाही कमालीचा घसरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कापसाचे उत्पादन कमालीचे घटण्याची चिन्हे असून उत्पादन होण्याची आशा राहिल्याने सध्या मोठ्या प्रमाणात कपाशीच्या शेतातून ट्रॅक्टर फिरवला जात आहे. मागील महिन्यात कापसाचा हंगाम सुरू झाला तेव्हापासून मागील दोन दिवसांपर्यंत कापसाचे दर सरासरी ४४०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल होते. दरम्यान, आज कापसाच्या कमाल दरात ३०० रुपयाने वाढ होऊन कापसाला खासगी बाजारात कमाल ४७००, तर किमान ४४०० रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

 

वायदे बाजारात कापूस वधारला : आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात मागील आठवड्यात कापसाचे दर सरासरी ६९ सेंट प्रति पौंडवर स्थिर होते. दरम्यान, मागील तीन-चार दिवसांपासून यात सातत्याने वाढ होत आहे. वायदे बाजारात कापसाचे दर साेमवारी ७३.२८ सेंट प्रति पौंडवर पोहोचले. वायदे बाजारात कापसाचे दर तडकल्याने किमान उत्पादन झालेल्या कापसाला तरी समाधानकारक भाव मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मागील वर्षी कापसाचे उत्पादन समाधानकारक होऊन दरही सरासरी हजार रुपये प्रति क्विंटल मिळाले.

बातम्या आणखी आहेत...