आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस पुन्हा 5 हजार 800 रुपयांवर, हरभऱ्याच्या दरात हजार ते बाराशे रुपयांची घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जानेवारीच्या अखेरीस सरासरी दोनशे रुपयांनी घसरलेले कापसाचे दर दोन दिवसांपासून सावरले असून जिल्ह्यातील खासगी बाजारात सरासरी ५८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळात आहे. शनिवारी येथील खासगी बाजारात कापसाला कमाल ५८२५ रुपये दर मिळाला. दरम्यान, कापसाचा आंतरराष्ट्रीय वायदे बाजार अद्यापही तेजीत असून शुक्रवारी वायदेबाजारात मार्च महिन्यांचे करार ७६.४१ सेंट प्रति पौंड दराने झाल्याने दर किमान सहा हजार रुपयांवर स्थिर राहण्याचे संकेत मिळाले आहे.
 
मागील महिन्यात देशातील बाजारपेठेत कापसाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम पडून भावात जानेवारीच्या अखेरीस दोनशे रुपयांनी घट झाली होती. दरम्यान, सुमारे चार दिवस स्थानिक बाजारात हि मंदी कायम राहून कापसाचे दर सरासरी ५६०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत असताना जिल्ह्यातील स्थानिक बाजारातील घसरणीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले होते. 
 
जिल्ह्यात सरासरी कापसाचे दर ५८०० रुपये प्रति क्विंटलवर गेल्यानंतर येथील खासगी बाजारात दररोज सुमारे तीन हजार क्विंटलची आवक सुरू होती. परंतु जानेवारीच्या अखेरीस भावात घसरण झाल्याने आवक सरासरी दोन ते अडीच हजार क्विंटलवर झाली होती. सध्या येथील खासगी बाजारात आवक घटली असून आज बाजारात २०५४ क्विंटल कापसाची आवक झाली. येथील बाजारात कापसाला किमान ५७०० तर कमाल ५८२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील इतर खासगी बाजारातही कापासचे दर आज सरासरी ५७०० ते ५८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते. 

वायेदबाजार पोहचला ७६.४१ सेंट प्रति पौंडवर 
आंतरराष्ट्रीयवायदे बाजारात डिसेंबरच्या अखेरीसपासून कापसाच्या वाढीला सुरवात झाली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय वायदेबाजाराचा सुचकांक ७६.४१ सेंट प्रति पौंडवर उघडला सरासरी ७३.७२ सेंट प्रति पौंडवर बंद झाला. आयसीईच्या (इंट्राकॉंन्टिनेंटल इंडेक्स) वायदे बाजारात मार्चमधील करार ७७.५७ सेंट तर कॉटलुक इंडेक्स ८५.७५ सेंट प्रति पौंड दराने झाले. 

खर्चाच्या तुलनेत भाव असमाधानकारक 
जिल्ह्यातयावर्षी कापसाचे समाधानकारक उत्पादन झाले असून खासगी बाजारात कापसाला सरासरी ५८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या दारात मात्र कापसाला सरासरी ५५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे खरीपातील इतर पिकांच्या भावावर जबर परिणाम झाला असताना सध्याचे कापसाचे मिळणारे भाव खर्चाच्या तुलनेत अल्प असल्याने अद्याप शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची साठवणूक केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपयांची अपेक्षा आहे. 
 
हरभऱ्याच्या दरात हजार ते बाराशे रुपयांची घसरण 
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी पुन्हा हरभऱ्याच्या दरात मोठी घसरण झाली असून हरभऱ्याला शनिवारी कमाल ५८११ तर ५००० रुपये प्रति क्विंटल झाली. हरभऱ्याच्या दरातील ही घसरण सरासरी हजार ते बाराशे रुपयांनी असल्यामुळे आगामी हंगाम डोळ्यासमोर असताना ही घसरण शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरत असल्याचे दिसून येत आहे. बाजारात नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. दोन दिवसांपुर्वीपर्यंत हरभऱ्याचे दर सरासरी सहा हजार ते ६५०० रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. परंतु नवीन हरभरा बाजारात आल्यानंतर हरभऱ्याच्या दरात सरासरी झालेली मोठी घसरण शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरणारी असल्याचे मानले जात आहे. गतवर्षी हरभऱ्याच्या दर सरासरी दहा हजारांवर गेले होते.
बातम्या आणखी आहेत...