आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशांतर्गत कापसाचा पेरा कमी; राज्यात मात्र ३८ लाख हेक्टरवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - २०१६-१७या हंगामात देशात ३३६ लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज काॅटन असोसिएशन आॅफ इंडियाने वर्तवला आहे. या संदर्भात कापूस पणन महासंघाचे माजी सरव्यवस्थापक गोविंद वैराळे यांच्याशी संपर्क साधला असता मागील हंगामात देशात ३१५ लाख हेक्टर पेरा होता. त्या तुलनेत या हंगामात १०३ लाख हेक्टरवर पेरा झाला. देशांतर्गत पेरा कमी झालेला असला तरी महाराष्ट्रात मात्र याही हंगामात ३८ लाख हेक्टर पेरा झाल्याचे वैराळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात या हंगामात सुधारणा होणे अपेक्षित आहे. २०१५-१६ मध्ये ७८ लाख गाठी उत्पादन झाले होते. या हंगामात ८७ लाख गाठी उत्पादन अपेक्षित असल्याचे वैराळे यांनी सांगितले. तेलंगणा आंध्र प्रदेशातील कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. तेलंगणामध्ये ४८ लाख आणि आंध्रमध्ये १५.५० लाख कापूस गाठींचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. तर गुजरातमध्ये मागील हंगामाएवढेच म्हणजेच ८८ लाख गाठी उत्पादन शक्यता आहे. कर्नाटक राजस्थानमधील उत्पादनात काही अंशी वाढ होण्याची शक्यता सीएआयने व्यक्त केली आहे.

८९लाख गाठी शिल्लक
याहंगामात देशात ३९८ लाख गाठी कापसाचा पुरवठा राहिल. त्यापैकी ३०९ लाख गाठींचा वापर होऊन ८९ लाख गाठी शिल्लक राहतील असा अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...