आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कापसाचे पिक डिसेंबरपूर्वीच काढून घ्या; गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अळीचे पुनरूज्जीवन रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी पीक मार्च-एप्रिलपर्यंत लांबविण्याचा हव्यास बाळगता ते डिसेंबरपर्यंत पूर्ण काढून घेण्याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा कापसापुढे गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी दिला आहे. 


बोंड अळीने कापसावर आक्रमण झाले आहे. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. मुळात यातील बाब लक्षात घेतली पाहिजे. गुलाबी बोंड अळी पुन्हा तयार होण्याची सायकल ब्रेक होणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. वाघमारे यांनी दिला. 

 

देशात आपल्याचकडे किडीचा प्रादुर्भाव झालाय? 
डॉ. वाघमारे :
देशातअनेक राज्यांमध्ये बीटी वाणांचा वापर होतोय. पंजाब आणि हरियाणात किडीचा प्रादुर्भाव यासाठी नाही की तेथे वेळेत पीक काढून घेतले जाते. त्यानंतर पर्यायी पिकांची लागवड केली जाते. अशा पद्धतीने शेत कीड मुक्त झाल्यावर पुढील हंगामात पुन्हा बीटीची लागवड केली जाते. याशिवाय शेतकऱ्यांनी विनाकारण कीटकनाशकांचा वापर टाळला पाहिजे. 


विदर्भात मान्यता नसलेल्या वाणांचीही लागवड मोठ्या प्रमाणात आहे? 
डॉ.वाघमारे :
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने अलिकडेच केलेल्या सर्वेक्षणात विदर्भात किमान २० टक्के कापूस क्षेत्रात तणनाशक प्रतिरोधक या मान्यता नसलेल्या बियाण्यांचा वापर शेतकऱ्यांनी केलेला असल्याचे आढळून आले. या वाणांचा वापर होऊ नये, यासाठी केंद्र राज्याच्या कृषी विभागाच्या यंत्रणांना आम्ही कळवले आहे. संबंधित कंपन्यांवर कारवाई देखील सुरु झाली असल्याचे सांगितले. 


केंद्रीय कापूस संशोधन संस्थेकडून काही वाण विकसित होत आहेत? 
डॉ.वाघमारे :
आम्ही बीटीचे सहा वाण विकसित केले आहे. सध्या त्याच्या चाचण्या आणि वाणाचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सुुरु आहेत. साधारण २०१९ हंगामात ते शेतकऱ्यांना उपलब्ध होतील. ते प्राधान्याने शासकीय कंपन्यांना आम्ही पुरविणार आहोत. 

बातम्या आणखी आहेत...