आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिली मेडिसिटी नागपुरात; हजार खाटांचे रुग्णालय, 2 लाख राेजगार उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबर २०१५ मधील ब्रिटन दौऱ्याच्या संयुक्त निवेदनामध्ये इंडोयूके इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मेडीसिटी या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार देशात ११ हेल्थ मेडीसिटी उभारण्यात येणार आहे.
 
पहिल्या मेडीसिटीचा कोनशीला अनावरण रविवारी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे काम तीन टप्प्यात पूर्ण होईल. सर्व टप्पे कार्यान्वित झाल्यानंतर मेडिसिटीत २ लाख रोजगार उपलब्ध होईल. यामुळे नागपूरची ओळख ‘टायगर कॅपिटल’ सोबतच ‘हेल्थ केअर हब’ म्हणून होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...