आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Court Hearing On Skype And Give Result By E mail

‘स्काइप’वर सुनावणी; ई-मेलद्वारे निकाल, मद्रास हायकोर्टाचा नवा आदर्श

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मद्रास हायकोर्टाच्या मदुराई पीठाने नवा आदर्श प्रस्थापित केला अाहे. लग्नाशी निगडित याचिका दाखल झाल्यानंतर तत्काळ कार्यवाहीसाठी कोर्टाने व्हिडिओ चॅटिंग साइट स्काइपवर सुनावणी केली. ई-मेलवर निकाल पाठवून दिला तेव्हा रविवारी धूमधडाक्यात लग्न लागले.
रामनाथपुरम जिल्ह्याच्या ओडाईकल गावातील अदाईकला माथा चर्चमध्ये रविवारी लग्न लागणार होते. मात्र, चर्च प्रशासन व कुटुबीयांत वाद उद्भवला. पोलिस संरक्षण मागण्यासाठी शनिवारी शेवटच्या क्षणी मदुराई हायकोर्टात याचिका दाखल झाली. दिवाळीनिमित्त दीर्घ सुट्यांमुळे बहुतांश न्यायाधीश बाहेरगावी होते. सहायक निबंधकाने प्रशासकीय जज व्ही. रामसुब्रमण्यम यांना अर्जंट याचिका दाखल झाल्याची माहिती दिली. तेव्हा त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश दिले. पोर्टफोलियो जज एस. वैद्यनाथन यांना चेन्नईतील त्यांच्या घरातूनच वकिलांचे युक्तिवाद स्काइपवर ऐकण्याची विनंती केली.
जजने आदेशात चर्चमध्ये लग्नाला संरक्षण पुरवण्याचे आदेश पोलिसांना दिले. लग्नाचे आयोजन चर्चच्या बाहेर होऊ नये, असेही सांगितले. दुसऱ्या चर्चमध्ये लग्नास नकार दिला. कोर्टातील अधिकाऱ्याने सांगितले, आम्ही कागदपत्रे स्कॅन करून वैद्यनाथन यांना ई-मेल केली. यानंतर याचिकाकर्त्याचे वकील व्ही. पनीरसेल्वम व सरकारी वकील एस. चंद्रशेखर यांनी स्काइपद्वारे युक्तिवाद मांडले. जजने पोलिस संरक्षण देण्याचा अादेश आम्हाला ई-मेल केला. आम्ही रात्री आठ वाजेआधी याचिकाकर्त्याला आदेशाचे प्रमाणित प्रत उपलब्ध करून दिली.
परंपरेऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून तत्काळ निकाल देण्याच्या हायकोर्टाच्या या आदर्शाची प्रशंसा होत आहे. वकील पनीरसेल्वम म्हणाले, स्थानिक पोलिसांच्या चुकीमुळे मला शेवटच्या क्षणी याचिका दाखल करावी लागली. पोलिसही चर्च प्रशासनाच्याच बाजून होते. संरक्षणाची मागणी करूनही त्यांनी गांभीर्य दाखवले नाही. मद्रास हायकोर्टाच्या १५३ वर्षांच्या इतिहासात इलेक्ट्रॉनिकली सुनावण्यात आलेला हा पहिलाच खटला ठरल्याचा मला अानंद आहे. विशेष म्हणजे या निकालाची प्रमाणित प्रत मिळण्यासही काहीच वेळ लागला नाही.