नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप एका याचिकेत करण्यात आला होता.
प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळल्यानंतर नागपूर जिल्हा न्यायालयात त्याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली असून ८ ऑक्टोबर रोजी व्यक्तिश: किंवा वकिलांमार्फत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.