आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या खुनातील आरोपीला जन्मठेप; दोन वर्षांपूर्वी घडली होती घटना, पाच हजारांचा दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अनैतिक संबंधातून महिलेवर सुऱ्याने वार करून तिला जीवनिशी मारल्या प्रकरणी दोष सिद्ध झाल्याने अचलपूर न्यायालयाने किशोर रघुनाथ गायकवाड (३०) रा. शिरजगाव कसबा याला जन्मठेप पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड भरल्यास महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

मृतक महिलेचा पती राजेश हरिश्चंद्र वानखडे (३५) रा. अंबाळा याने फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीची पत्नी आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादीच्या पत्नीस दिलेला मोबाईल नगदी पैसे परत मािगतले. यावरून त्यांच्यामध्ये उद्भवलेल्या वादातून आरोपीने मृतक महिलेल्या गळ्यावर, पाठीवर, पाठीवर, हातावर वार करून जीवानिशी ठार केले होते. ही घटना २६ जुलै २०१५ मध्ये घडली होती. या प्रकरणी अचलपूरचे तदर्थ जिल्हा न्यायाधीश एम. एस. शेख यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. आरोपीचा दोष सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेप पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड भरल्यास महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता डी. ए. नवले यांनी काम पाहिले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मंगेश मोहड यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 
बातम्या आणखी आहेत...