आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये गोवंशाचे 750 किलो मांस जप्त, 5 आरोपींना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- दर्यापूर शहरातील बाभळी येथील कुरैशीपुरा परिसरात पोलिसांच्या क्युआरटी पथकाने मंगळवारी सकाळी धाड टाकून ७५० किलो गोवंशाचे मांस जप्त केले असून, पाच आरोपींना अटक केली आहे. शेख हाफीज शेख मुसा (वय ३० ),जानु महमद शेख हुसेन (वय ४७ ), शेख हजीज शेख रशिद (वय ४५ ), शेख इब्राहीम शेख इस्माईल (वय २४ ), शेख उसमान शेख इस्माइल (वय २५ ) सर्व रा. कुरैशीपुरा, बाभळी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. ही कारवाई एसडीपीओ सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मुकुंद ठाकरे ,पीएसआय रितेश राऊत , रिना कोरडे, नंदलाल लिगोट ,रोशन सैय्यद, ना.पो.का.अशोक काकडे, बळवंत दाभने, प्रवीण बोंडे ,सुनील साबळे,विनोद पवार, नीलेश गावंडे, दिलीप घोडे , शरद सारसे, शीतल जाधव, अपर्णा लोहट आदींनी केली. 
बातम्या आणखी आहेत...