आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाका विक्री दुकानांना शहरात ठराविक परवाने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटनांचे संभाव्य धोके लक्षात घेता भरवस्तीमध्ये लागणाऱ्या फटाक्यांच्या दुकानांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून,फक्त खुल्या मैदानातच विशिष्ट अंतरावर मर्यादित संख्येत दुकाने लावण्यास परवानगी दिल्यामुळे लोकवस्तीमध्ये थाटल्या जाणाऱ्या दुकानांवर पोलिस कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे.
सर्वांची दिवाळी सुखाची, आनंदाची जावी, हाच यंदा प्रशासनाच्या फटाक्यांबाबत असलेल्या काटेकोर भूमिकेचा मुख्य उद्देश आहे.

फटाक्याची दुकाने ही मोकळ्या मैदानात हवीत, प्रत्येक दुकानात अग्निशमन उपकरण, रेती, पाणी असणे आवश्यक आहे. जर चौकात एखादे फटाक्याचे दुकान असेल तर त्या दुकानाच्या वर कोणीही राहत नसावे या अटींसह “एक दुकान एक परवाना’ या तत्त्वावर पोलिस विभागाने यंदा फटाक्यांच्या दुकानांना परवानगी दिली आहे.

यंदा सुरक्षेच्या दृष्टीने मोकळ्या मैदानातही ठराविक संख्येत आणि अंतरावर दुकाने थाटण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. दुकानांमध्ये सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या काही नाही याचीही वारंवार शहानिशा केली जाणार आहे.

नुकतीच एमपीसीबीद्वारे किरण नगर येथे फटाक्यांची ध्वनी स्तर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत पारदर्शकता बाळगण्यासाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कोणालाही सांगता ऐनवेळी फटाके खरेदी करून ते एमपीसीबी, विस्फोटक विभाग, पोलीस आणि पर्यावरण एनजीओंच्या उपस्थितीत ते फोडले. या चाचणीत फटाक्यांचा आवाज पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत तपासण्यात आली. हा आवाज १२० डेसीबल पर्यंत किंवा जास्तीत जास्त १४५ डेसीबलपर्यंत आहे की नाही ते यंत्राद्वारे तपासण्यात आले. हा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. फटाके फोडताना ध्वनी किंवा वायू प्रदूषण होऊ नये याकडेही कटाक्षाने लक्ष पुरविले जाणार आहे. मुले फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पालक िकंवा जबाबदार व्यक्तीच्या उपस्थितीतच मुलांनी फटाके फोडायला हवेत, असे आवाहनही समाजसेवी संस्थांद्वारे करण्यात आले आहे. महानगर पालिका फटाक्यांच्या दुकानदारांकडून हजार रुपये स्वच्छता शुल्क आकारणार आहे.
चिनीफटाके टाळणेच हिताचे
दोनवर्षांआधी चायनाचे फटाके जप्त करण्याची मोहीम राबवण्यात आली होती. या फटाक्यांचा आवाज हा प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठरविलेल्या डेसीबलच्या मानकांपेक्षा जास्त होता. तसेच त्यामुळे वायू प्रदुषणही होत होते. यावेळीही फटाके खरेदी करताना फटाके विक्रेता चिनी फटाके विकत तर नाही ना याचाही आम्ही शोध घेतला. मात्र कुठेही असे फटाके आढळले नाहीत. चिनी फटाके हे आकर्षक असले तरी त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे िदवाळी साजरी करताना अशा फटाक्यांपासून दूर राहणेच हितावह असल्याचे मत एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

शरीर,पैसा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याचे आवाहन: यंदाच्यािदवाळीत कमीत कमी फटाके फोडून आनंद साजरा करा तसेच शरीर, पैसा पर्यावरणाचा ऱ्हास टाळा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयासह, समाजसेवी संस्थांद्वारे करण्यात आले. सर्विनयम पाळणार :सुरक्षेचे सर्विनयम पाळणार असून त्यानुसारच फटाक्यांची विक्री करणार आहोत. सुरक्षा ही सर्वांसाठीच महत्त्वाची असल्याचे गुढे फटाका भंडारचे संचालक अभिजित गुढे यांनी सांगितले.

नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे
^नागरिकांनी फटाके फोडणे टाळून किंवा परंपरेनुसार फारच कमी फटाके फोडून वायू ध्वनी प्रदुषण रोखण्यास हातभार लावावा. त्यातून निघणाऱ्या घातक वायूमुळे मेंदू, फुफ्फुस, श्वसनावर परिणाम होतो. फटाके कमी फोडल्याने पैशाची बचत तर होईलच शिवाय आरोग्यावर विपरित परिणामही होणार नाही. रा.म.वानखेडे, प्रादेशिक अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अमरावती.

पोलिसांनी तयार केलेे फटाका विक्रीचे नियम
फटाका विक्री साठवणुकीच्या ठिकाणाचे पक्के बांधकाम असावे, आपातकालीन स्थिती उद्भवल्यास बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग असावा, फटाका विक्री साठवणुकीच्या जागेचे क्षेत्रफळ १० गुणीले १० चौरस फुटापेक्षा कमी १७ गुणीले १७ चौरस फुटापेक्षा जास्त नसावे, फटाक्याचे दुकान साठवणुकीचे ठिकाण तळमजल्यावर नसावे, दुकानाच्या वरील भागात निवासी रहिवास नसावा, लिफ्ट, जिना याच्या जवळ किंवा खाली नसावे, दुकान मोकळ्या मैदानात अन् पÂाचे शेड असावे, पाणी, अग्निशमन यंत्र, वाळूच्या बादल्या असाव्यात, ज्वालाग्रही पदार्थ नसावा.
बातम्या आणखी आहेत...