आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोंगरगाव येथील वीर जवान गौतम इंगळेंना अखेरचा निरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - मातृभूमी आणि देशवासीयांचे रात्रंदिवस प्राणपणाने रक्षण करणाऱ्या तालुक्यातील डोंगरगाव येथील सीआरपीएफचे जवान गौतम भीमराव इंगळे (वय ३०) यांना मंगळवारी (दि. ४) शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील शेकडो गावकरी गौतम यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदूस्थान, जिंदाबाद गौतम इंगळे अमर रहेच्या घोषाने आसमंत दुमदुमून गेला होता.
जम्मू कश्मीरमधील कटरा येथे वैष्णव देवी मंदिर परिसरालगत रविवारी रात्री गस्तीवर असताना गौतम पाय घसरून खोल दरीत पडले. या घटनेची माहिती गावात पोहचल्यानंतर गावातील वातावरण सुन्न झाले होते. मंगळवारी (दि. ४) गौतम यांचे पार्थिव लष्कराच्या ताफ्यासह दुपारी एक वाजताच्या सुमारास डोंगरगावात आले. गौतम यांचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनात ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सात जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर दुपारी दोन वाजता सैन्यातच असलेला गौतम यांचा मावसभाऊ गोलू बन्सोड यांनी पार्थिवाला भडाग्नी दिली. यावेळी आमदार रमेश बुंदिले, प्रभारी एसडीअो राहुल तायडे, एसडीपीओ सचिन हिरे, बीडीओ अरविंद गुळधे, पं. स. सभापती रेखा वाकपांजर, उपसभापती संजय देशमुख, डाॅ. कमलताई गवई, बळवंत वानखडे, कृउबा सभापती बाबाराव बरवट, सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब वानखडे, सुनील डिके, खल्लारचे ठाणेदार शंकर शिंपीकर, नितीन गवारे, महसूल पोलिस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.

अन्परिसर गहिवरला : गौतमइंगळे यांचे पार्थिव मंगळवारी डोंगरगावातील घरासमोर आणताच गौतम यांची आई, पत्नी बहिणीने हंबरडा फोडला. तिघींच्याही हृदय हेलावणाऱ्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावली सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. नातेवाईकांच्या आक्रोशामुळे परिसरातील वातावरण स्तब्ध झाले होते.
बातम्या आणखी आहेत...