आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे शाखेकडून ‘मैत्रेय’ची 190 कोटींची मालमत्ता उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जवळपास दहा महिन्यांपूर्वी शहरात ‘मैत्रय’विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने ‘मैत्रय’ची तब्बल १९० कोटींची मालमत्ता उघड करून त्यासंदर्भातील कागदपत्र हस्तगत केले आहेत. ‘सेबी’ ने विक्री करण्यास मनाई केल्यानंतरही ६५ कोटींची मालमत्ता ‘मैत्रेय’ने परस्पर विक्री केल्याचे पुढे आल्याने ही मालमत्ता खरेदी करणाऱ्या १२३ मालमत्ताधारकांनाही पोलिस आता नोटीस बजावणार आहे. 

‘मैत्रय’ने शहरातील गुंतवणूकदारांना ठराविक काळानंतर रक्कम भूखंड देण्याचे आमिष देऊन हजारो गुंतवणकदारांची फसगत केल्याची तक्रार समोर आल्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी १० मार्च २०१६ ला ‘मैत्रेय’विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हे प्रकरण काही महिन्यांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आतापर्यंत ‘मैत्रेय’विरुद्ध तक्रारदार करणाऱ्या नागरिकांची संख्या २० हजार झाली असून फसवणुकीची रक्कम ३० कोटींच्यावर गेली आहे. 

दरम्यान, पोलिसांनी ‘मैत्रेय’ ची राज्यासह राज्याबाहेरील मालमत्तेचा शोध घेतला. १३ सप्टेंबर २०१६ ला १५ कोटी ८८ लाख १० हजार रुपयांची मालमत्ता उघड करून सक्षम प्राधिकारी नेमण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला. त्यानंतर ३१ कोटी ९० लाख हजारांची मालमत्ता उघड केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण ४७ कोटी ७८ लाख १५ हजार ५३५ रुपयांच्या मालमत्तेवर निर्णय घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची यापूर्वीच नियुक्ती केली आहे. 

दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मैत्रेयची नव्याने १४२ कोटी ८० लाख हजार ७८४ रुपयांची मालमत्ता उघड केली. यापैकी ७७ कोटी ६८ लाख १५ हजार २७ रुपयांच्या मालमत्तेवर निर्णय घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी नेमावा, यासाठी पोलिस तिसरा प्रस्ताव पाठवणार आहे. ‘सेबी’ने २५ मार्च २०१३ लाच मालमत्ता विक्री करू नये, असे ‘मैत्रेय’ला बजावले होते. तरीही ‘मैत्रेय’ने १२३ मालमत्तेची विक्री केली आहे. 

‘त्या’ मालमत्ताधारकांना बजावणार नोटीस 
‘सेबी’नेविक्री करण्यास मनाई केल्यानंतरही ६५ कोटींची मालमत्ता ‘मैत्रेय’ने परस्पर विक्री कली आणि ही मालमत्ता ज्यांनी घेतली त्यांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार आहे. गणेशअणे ,पाेलिस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा,अमरावती. 

सक्षम प्राधिकारी नेमण्याची गरज नाही 
या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिस पुढील निर्णय घेऊन गुंतवणूकदारांना दिलासा देऊ शकतात. त्यामुळे परस्पर विक्री केलेल्या ६५ कोटी ११ लाख ९२ हजार ७८४ रुपयांच्या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमण्याची आवश्यकता नाही, असेही पोलिस निरीक्षक अणे यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशान्वये पोलिस पुढील निर्णय घेणार आहेत. 
 
या प्रमुख ठिकाणी आढळली मालमत्ता 
‘मैत्रय’ने विक्री केलेल्या मालमत्तेमध्ये नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी येथे १०८, वडाळा येथे ६, अडगावला १, कल्याणमधील पातरलीला एक विरारला सात अशी एकूण १२३ ठिकाणांच्या मालमत्तेचा समावेश आहे. एमपीआयडीचे कलम च्या तरतूदीप्रमाणे पोलिस न्यायालयाच्या आदेशानुसार मालमत्तेसंदर्भात निर्णय घेऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...