आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राइम ब्रँचसह पाच ठाणे प्रभारींच्या भरवशावर, १३ पैकी केवळ अधिकारी अमरावतीत झाले रुजू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्यांतर्गत अमरावती आयुक्तालयातून आठ पोलिस निरीक्षक बदलीवर गेले तर दोन एसीपींसह अकरा पोलिस निरीक्षकांची अमरावतीत बदली झाली. मात्र, जवळपास तीन आठवड्यांचा कलावधी लोटूनही ११ पैकी फक्त चारच पोलिस निरीक्षक रुजू झाल्याने आयुक्तालयातील क्राइम ब्रँचसह तब्बल पाच पोलिस ठाण्यांचा कारभार प्रभारी ठाणेदारांच्या भरवशावर सुरू आहे. दरम्यान, अमरावती आयुक्तालयात रुजू होण्यास पोलिस अधिकाऱ्यांची नकारघंटा कारणीभूत ठरत आहे.
जवळपास तीन आठवड्यांपूर्वी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या तर दोन आठवड्यांपूर्वी डीवायएसपी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या. या बदल्यांमध्ये पोलिस आयुक्तालयातून आठ पोलिस निरीक्षक बदलीवर गेलेत तर नवीन ११ पोलिस निरीक्षकांची बाहेरून आयुक्तालयात बदली झाली. तसेच दोन एसीपी येणार आहेत. मात्र, आतापर्यंत अायुक्तालयात केवळ चार पोलिस निरीक्षक रुजू झाले आहे. बदली झालेल्या आठही पोलिस निरीक्षकांना पोलिस आयुक्तांनी कार्यमुक्त केले आहे. यामध्ये खोलापुरी गेटला ठाणेदार असलेले राधेश्याम शर्मा, वलगाव रणवीर बयस, बडनेरा विजय साळुंके, राजेंद्र म्हस्के, कुमार आगलावे, नरेंद्र पाटील, दिलीप वडगावकर यांचा समावेश आहे. त्यापैकी आर्थिक गुन्हे शाखेचे गणेश अणे यांचा अपवाद वगळता पोलिस अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच राजापेठचे एसीपी मिलिंद पाटील, नागपुरी गेटचे ठाणेदार दत्ता पावडे आणि भातकुलीचे ठाणेदार दिलीप इंगळे हे मागील अनेक दिवसांपासून रजेवर गेले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत पोलिस आयुक्तांसमोर कमी अधिकाऱ्यांना घेऊन आयुक्तालय चालवण्याचे आव्हान उभे झाले आहे. दरम्यान, सध्या वलगावला प्रभारी ठाणेदार अर्जुन ठोसरे, नागपुरी गेटला शिवा भगत, खोलापुरी गेटला अनिल कुरळकर, राजापेठला शिशिर मानकर आणि भातकुलीला सूर्यकांत राऊत या अधिकाऱ्यांकडे प्रभार देण्यात आला आहे. याच वेळी एसीपी राजापेठ मिलिंद पाटील रजेवर असल्यामुळे फ्रेजरपुरा परिक्षेत्राचे एसीपी रियाजोद्दीन देशमुख यांच्याकडे राजापेठ तसेच क्राइम एसीपींचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे.

दोनएसीपींची प्रतीक्षा : आयुक्तालयातदोन एसीपींचीसुद्धा बदली ऑर्डर झालेली आहे, मात्र तेसुद्धा अद्याप रुजू झाले नाही. तसेच ११ पोलिस निरीक्षकांपैकी केवळ चारच पोलिस निरीक्षक रुजू झाले आहेत. यावरून पुन्हा एकदा लक्षात आले की, अमरावतीत येण्यासाठी अधिकाऱ्यांचा नकार सूर कायम आहे. कारण अमरावतीतून बदली झाल्यानंतर कार्यमुक्त होण्यासाठी अधिकारी धावपळ करताना दिसतात. मात्र, त्याच पद्धतीने अमरावतीत रुजू होत नाही.

लवकरच निर्णय घेणार
^बाहेरून बदलीवर येणाऱ्या ११ पैकी केवळ अधिकारी रुजू झाले आहे. बदली झालेल्या पैकी अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे पाच ठाण्यांना तात्पुरते अधिकारी देण्यात आले आहे. अजून काही दिवस बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करणार आहे. अन्यथा आहे त्या अधिकाऱ्यांची ‘पाेस्टिंग’ करणार आहे. लवकरच हा निर्णय घेण्यात येणार आहे. दत्तात्रय मंडलिक, पोलिसआयुक्त,अमरावती.

ही गंभीर बाब
^नियमा नुसार बदली होऊनही त्या ठिकाणी रूजू होणे ही गंभीर बाब आहे. यासंदर्भात पोलिस महासंचालकांशी चर्चा करून बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने रूजू होण्यासंबंधी आदेश दिले जातील. डाॅ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री.