आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम ब्रँचने पकडला दुचाकी चोरटा, दहा दुचाकी चोरल्याची चोरट्याने दिली कबूली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरपोलिसांच्या ‘क्राईम ब्रँच’ने गुरूवारी (दि. १२) सकाळी एका अट्टल दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीतच त्याने पोलिसांना शहरातून तब्बल दहा दुचाकी चोरल्याची कबूली दिली. त्यामुळे पोलिसांनी दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्याचा एक सहकारी पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. नागपूरी गेट भागातील ताजनगरमध्ये राहणाऱ्या वकार अहमद मो. हारुन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना मागील अनेक दिवसांपासून याचा शोध होता. दरम्यान शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पीएसआय नितीन थोरात अय्युब शेख यांच्या पथकाने याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने शहरातील विवीध भागातून दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. 
 
त्यामुळे पोलिस पथकाने गुरूवारी सकाळपासून चोरीच्या दुचाकी जप्त करण्याची मोहीम सुरू केली होती. दरम्यान गुरूवार सांयकाळपर्यंत पोलिसांनी दहा दुचाकी जप्त केल्या आहेत. यापैकी सहा दुचाकी कोठून चोरल्या, ही बाब पोलिसांपुढे आली असून पाच दुचाकी कोतवालीच्या तर नागपूरी गेट ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली आहे. पोलिसांनी पकडलेला हा चोरटा गवंडी काम करतो. या सर्व दुचाकी त्याने प्रत्येकी हजार रुपयात विक्री केल्या होत्या, असेही पेालिसांच्या तपासात पुढे आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेष आत्राम, नितीन थोरात, अय्युब शेख, युसूफ सौदागर, राजेश पाटील, देवेन्द्र कोठेकर, सचिन कारंजकर, संजय अडसळे, राजेश बैरट यांच्या पथकाने केली आहे. 

चोरीच्या दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू : पोलिसांनीपकडलेल्या चेारट्याने या दुचाकी मागील सात ते आठ महिन्यांत चोरलेल्या आहेत. यापैकी एका दुचाकीचा चांदूर रेल्वे मार्गावर काही दिवसांपुर्वी अपघात झाला होता. या अपघातात शेख अहमद शेख हुसेन (रा. अकबरनगर) व्यक्तीचा मृत्यू झाला. 
 
अाणखी काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता 
आम्ही एका दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या आतापर्यंत १० दुचाकी जप्त केल्या आहेत. त्याचा एक सहकारी पसार असून त्याचा शोध सुरू असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अजूनही काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे. प्रमेषआत्राम, पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा.