आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : बिबट्याच्‍या चामड्याची पूजा, शिक्षकांसह चौघे रंगेहाथ जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो.
गडचिरोली - बिबटयाची शिकार कातडे अवैधरित्या बाळगणाऱ्या चार जणांना वनाधिकाऱ्यांनी एटापल्ली तालुक्यातील घोटसूर येथून अटक केली. हे चौघे चामड्याची पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्‍याची विधी करत होते, अशी माहिती वन विभागाच्‍या पथकाला मिळाली आहे. धक्‍कादायक बाब म्‍हणजे या चौघांमध्‍ये जिल्‍हा परिषदेच्‍या दोन शिक्षकांचाही समावेश होता.
संजय महादेव देशपांडे, शरद रामचंद्र दोहतरे हे दोघेही घोटसूर येथील राहणारे. तर, संतोष आगलावे (राजुरा) व किसन देवकर (गडचांदूर जि.चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. आज चारही जणांना अहेरी न्यायालयामध्‍ये हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने सर्वांना 5 जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावली.
काय आहे प्रकरण...
- घोटसूरमध्‍ये एका व्‍यक्‍तीजवळ बिबटयाचे कातडे होते.
- काहीजण पूजा-अर्चा करण्यासाठी तेथे आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली.
- वनाधिका-यांनी इतर अधिकारी कर्मचा-यांना सोबत घेऊन रात्रीच घोटसूर गाव गाठले.
- यावेळी संजय देशपांडे याच्या शेतात हे चौघे कातडे ठेवून पूजा करताना दिसले.
- वनाधिकाऱ्यांनी या सर्वांना ताब्यात घेऊन अटक केली.
- संजय देशपांडे व शरद दोहतरे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.
विश्‍लेषण - अंधश्रद्धा निर्मूलनाची मोठी चळवळ देशभरात काम करत आहे. शेकडो शिक्षक या चळवळीत सहभागी आहेत. समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणे हे शिक्षकांचे कर्तव्‍य आहे. मात्र, या प्रकरणात गुप्‍तधन शोधण्‍यासाठी शिक्षकच बिबट्याच्‍या कातड्याची पुजा करताना आढळले. तर, विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍याकडून कोणता आदर्श घ्‍यावा, असा प्रश्‍न यानिमित्‍ताने व्‍यक्‍त होत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा...,
दोन कारमध्‍ये समोरासमोर धडक, एका कारने घेतला पेट
पालघर- डोक्‍यात दगड घालून एकाची हत्‍या
मळवली-कामशेत दरम्यान रेल्वे रुळाला तडे