आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा काटा काढून मृतदेह घरातच पुरला, प्रेमसंबंधात ठरत होता अडसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपुर- प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने काटा काढून मृतदेह घरातच पुरल्याचे धक्कादायक प्रकरण नागपुरात रविवारी उघडकीस अाले अाहे. रमेश बानेवार (वय ३५) असे मृताचे आहे.
रमेश राहत असलेल्या ताजनगर परिसरातील घराला दोन-तीन दिवसांपासून कुलूप लागलेले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याची तसेच काहीतरी संशयास्पद घडल्याची तक्रार त्यांच्या शेजाऱ्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात केली होती. पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच घटनास्थळी पोहोचून पंचासमक्ष कुलूप तोडले. त्यावेळी ही घटना उघड झाली. मधल्या खोलीत नव्याने लावण्यात आलेल्या टाइल्स काढून खाेदल्यानंतर रमेशचा कुजलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांना शेजाऱ्यांकडे सखाेल चाैकशी केली, असता प्रकरण संशयास्पद असल्याचे समाेर अाले.
रमेश हा पत्नी व तीन मुलांसह ताजनगरात घर घेऊन राहत होता. किरकोळ कामे करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. रमेशच्या पत्नीचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते. त्यावरून पती-पत्नीमध्ये वादही व्हायचे. शेजाऱ्यांनाही त्याची माहिती होती. यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.
तीन दिवसांपूर्वी रमेशची पत्नी मुलांना घेऊन घाबरलेल्या अवस्थेतच घराबाहेर पडल्याचे अनेकांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, आरोपींपैकी अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.