आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन् चोराने लिहिले ‘चूक झाली माफ करणे ILU सॉरी’, काहीच न मिळाल्याने पडला प्रेमात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सिव्हिल लाइन्समधील रामनगरातील एका घरात चोरटे घुसले. चोरून नेण्यासारखे त्यांना घरात काहीच सापडले नाही. त्यानंतर त्यांनी घरातील एका भिंतीवर लाल अक्षरात लिहिले, ‘चूक झाली माफ करणे, आयएलयू सॉरी’ अन् चोरटे खाली हात निघून गेले. चोरट्यांनी चोरीची लढवलेली नवी शक्कल पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

चोरांनीही आपल्या भावना आता व्यक्त करायला सुरुवात केल्याचे गुरुवारच्या घटनेवरून दिसून आले. चोरट्यांनी रामनगरातील दोन घरांना लक्ष्य केले. त्यांनी सकाळी ते वाजताच्या सुमारास डॉ. किशोर मालोकार यांच्या घरात प्रवेश केला. घरातील सर्व कुटुंब बेडरूममध्ये झोपले होते. या वेळी त्यांनी घरातील देवघरातील चांदीचा छोटासा गडवा, एक प्याला त्याची किंमत ५०० रुपये अंगणात उभी असलेली सुझुकी कंपनीची ६३ हजार रुपये किमतीची नवी दुचाकी चोरून नेली. मालोकार यांच्या घराच्या समोरच्या कॉलनीमध्ये बी. ए. बेलखेडे राहतात. बेलखेडेंच्या घरात चोरटे याच रात्री घुसले. संपूर्ण घराचा त्यांनी शोध घेतला. मात्र, त्यांना चोरून नेण्यासाठी काहीही सापडले नाही. मेहनत वाया गेली असे समजून हताश झाल्यानंतर अखेर त्यांनी घरातील भिंतीवर ‘चूक झाली माफ करणे, आयएलयू सॉरी’ असे लिहून ठेवले नंतर ते निघून गेले. घरात पडलेल्या अस्ताव्यस्त वस्तुंवरून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर घरात चोर घुसल्याचे लक्षात आले होते. पोलिसांनी या दोन्ही घराची चौकशी केली. इन्व्हेस्टिगेशन कार, डॉग स्कॉडलासुद्धा पाचारण केले होते. घटनेचा तपास ठाणेदार अन्वर एम. शेख यांच्या मार्गदर्शनात पीएसआय बावस्कर डिबीस्कॉडचे कर्मचारी करत आहेत.

कुलुपाच्याचाव्या दर्शनी ठिकाणी ठेवू नये : बहुतांशघरात चोरी झाली. त्यात चाव्यासाठी चोरट्यांना फारशी मेहनत करावी लागली नाही. अनेक रात्री लोकं गेटला कुलूप लावतात. घरची एखादी व्यक्ती रात्री उशिरा येईल म्हणून चाव्या बाहेरच दर्शनी ठिकाणी लटकवून ठेवतात. त्यात दुचाकीच्याही चाव्या असतात. घरातही कपाटाच्या चाव्या बाहेर लॉकरच्या चाव्या कपाटात ठेवल्या जातात. त्यासाठी चोरट्यांना अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत. अनेक घटनांमध्ये चोरांच्या हातात लगेच चाव्या पडल्याचे दिसून आले. त्यामुळे घरात काही नाही मिळाले तरीही अंगणातील दुचाकी मात्र चोरटे घेऊन पळतात. त्यासाठी चाव्या दर्शनी ठिकाणी ठेवू नयेत. कदाचित एखादेवेळी कुलूप तोडण्यात त्यांना वेळ लागेल तेवढ्यात कुणालातरी जाग आल्यास चोरीची घटना टळू शकते.

गोडबोले प्लॉटमध्ये घरफोडी : डाबकीरोडवरील गोडबोले प्लॉटमधील राजेश मधुकर वानखडे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला घरातील ६८ ग्रॅम दागदागिने १० हजार रुपये रोख चोरून नेले. वानखडे हे त्यांच्या कुटुंबासह १६ ऑगस्टपासून बाहेर गावी गेले होते. ते गुरुवारी परत आल्यानंतर त्यांना कुलूप तोडलेले दिसून आले. त्यांनी घरात बघितले असता डब्यात ठेवलेले गळ्यातील पोथ, गोफ, तीन अंगठ्या, कानातील ठापसे, नथ, कानातील वेल, आेम लॉकेट असे ६८ ग्रॅम वजनाचे दागिने १० हजार रुपये असा एक लाख ४६ हजार रुपयांचा एेवज चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी डाबकी रोड पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

चोरीची पद्धत एकच
बेडरूमचे दार आतून बंद असल्यामुळे चोरट्याने दाराच्या बाहेर खुर्च्या उभ्या केल्या होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीतही चोरट्याने बेडरूमच्या दाराला दोरी बांधली होती. दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये एकच पद्धत वापरल्याने चोरटे एकच असावेत, अशी शंका पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दिशेने तपास सुरू केला आहे.
बातम्या आणखी आहेत...