आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणकर्त्यांची सीओंना मारहाण, रुग्णवाहिकेच्या गैरवापराचे प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी- येथीलनगर परिषदेच्या रुग्णवाहिकेचा गैरवापर होत असल्याच्या कारणावरून मुख्याधिकारी आक्रमक युवक संघटनेच्या उपोषणकर्त्यांमध्ये झालेल्या शाब्दिक वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाले. उपोषणकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि. १३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास नगर परिषद कार्यालयासमोर घडली.याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात अाली आहे.

नगर परिषदेजवळ एक रुग्णवाहिका होती, परंतु ती जुनी झाल्यामुळे नवीन रुग्णवाहिका घेण्याचा प्रस्ताव २४ ऑगस्ट २०१४ मध्ये नगर परिषद सभागृहात मांडण्यात आला होता. घेण्यात येणारी गाडी ही ७.५० लाख रुपयांपर्यंत घेण्यात यावीत, असे शासनाचे निर्देश होते. मात्र नगर परिषदेच्या वतीने रुग्णसेवेसाठी स्टेट बँक ऑफ अंजनगाव यांच्याकडून कर्ज घेऊन १६ लक्ष रुपयांची (एमएच २७/एए०४८९) ही गाडी घेण्यात आली, परंतु याचा वापर रुग्णसेवेसाठी होता मुख्याधिकारी राजकीय पुढाऱ्यांसाठी होत असल्याचा आरोप आक्रमक युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या मुद्यावरूनच संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बुधवारी (दि.१२) उपोषणाला बसले होते. उपोषणकर्त्यांना भेट देण्यासाठी म्हणून गुरुवारी मुख्याधिकारी सुधाकर पानझाडे, डॉ. सतीश हंतोडकर, आरोग्य निरीक्षक मनोहर सावरकर गेले असता उपोषणकर्ते अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातच उपोषणकर्त्यांनी मुख्याधिकारी पानझाडे यांना मारहाण केली. याबाबत मुख्याधिकारी पानझाडे यांनी अंजनगाव सुर्जी पोलिसांत उपोषणकर्त्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. संघटनेचे उपोषणकर्तेदेखील अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.

गंभीर अाजारी गरजू रुग्णांच्या मदतीसाठी घेतलेल्या रुग्णवाहिकेचा जर अधिकारी पदाधिकारी गैरवापर करीत असतील तर संघटनेने निवडलेला उपोषणाचा मार्ग योग्य होता.या आंदोलनाद्वारे उपोषणकर्त्यांनी वरिष्ठांचे लक्ष वेधून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करायला हवा होता,अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान,गुरुवारी घडलेल्या हाणामारीच्या घटनेमुळे रुग्णवाहिकेचा होणारा गैरवापर सध्या चर्चेचा िवषय ठरला आहे.

उपोषण सोडवण्यासाठी गेलो होतो मंडपस्थळी
गुरुवारीदुपारी १२ वाजताच्या सुमारास चार्ज घेतल्यानंतर उपोषणकर्ते पावसातच उपोषणास बसल्यामुळे माणुसकीच्या नात्याने त्यांना समजावण्यासाठी गेलो होतो. भांडण करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. उपोषणकर्त्यांनी मला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे माझ्या हाताला पायाला दुखापत झाली. सुधाकरपानझाडे, मुख्याधिकारी, न.प. अंजनगावसुर्जी.
आमचे उपोषण जनहितार्थ
नगरपरिषदेने रुग्ण सेवेसाठी रुग्णवाहिका विकत घेतली, परंतु तिचा वापर नगर परिषदेचे अधिकारी पदाधिकारी आपापल्या वैयक्तिक कामासाठी करतात. याबाबत आक्रमक संघटनेकडून पत्रव्यवहार केला, परंतु त्याबाबत काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. म्हणून आम्ही उपोषणाला बसलो. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस असून आज प्रभारी मुख्याधिकारी अधिकारी यांनी येऊन आम्हाला शिवीगाळ केली. सदर गाडी रुग्णसेवेसाठी नाही, तर ऑफिसच्या कामासाठी आहे, असे म्हणत वाद घातला आम्हाला मारहाण केली. गजाननआठवले, उपोषणकर्ते.