आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीवनसाथी’ सोडून गेला आता ‘माहेर’चा आधार,नागपूरच्या पीडितेची दगाबाजाविरुद्ध तक्रार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नागपुरात राहणाऱ्या एका विधवा महिलेला शहरात राहणाऱ्या धामणगाव येथे न्यायालयात लिपिक असलेल्या घटस्फोटित व्यक्तीने ‘जीवनसाथी’ वेबसाईटवर विनंती पाठवली होती. ही व्यक्ती आपल्या आयुष्याचा आधार होईल याच आशेने त्या महिलेने विनंती मान्य केली. लग्नाच्या आणाभाका देऊन त्याने या महिलेवर अत्याचार केला आणि लग्नासाठी नकार दिला. अखेर या खचलेल्या विधवेने बुधवारी (दि. ३) शहरात येऊन ‘माहेर’ बहुद्देशीय संस्थेला आपबीती सांगितली. त्यावेळी ‘माहेर’ने आधार दिला. त्या अत्याचारी व्यक्तीविरुद्ध पीडित महिलेने बुधवारी (दि. ३) रात्री राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात पीडितीने गुरूवारी (दि. ४) प्रसारमाध्यमांसमोर आपबीती मांडली.
नागपुरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेच्या पतीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून ही महिला, तिची ११ वर्षांची मुलगी आणि वृद्ध आईसोबत राहत आहे. रुग्णालयांमध्ये ‘केअर टेकर’चे काम करून ती कुटूंब चालवत आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी या पीडित महिलेने विवाह जुळवणारी ऑनलाईन नोंदणी संस्था ‘जीवनसाथी’वर स्वत:चे अकाऊंट उघडले होते. दरम्यान डिसेंबर २०१५ मध्ये अमरावती येथील ४२ वर्षीय व्यक्ती जो धामणगाव रेल्वे येथे न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदावर काम करणाऱ्या आरोपीने महिलेला ‘जीवनसाथी’वर विनंती पाठवली. या महिलेनेसुद्धा ती विनंती मान्य केली. दोघांनीही माहितीची देवाण घेवान केली. त्याने स्वत: घटस्फोटित असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तो नागपुरात जाऊन लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.

पत्नीच्या नावे दिली धमकी
याव्यक्तीने माझ्यावर अन्याय केला. त्याचे शहरातील काही महिलांसोबत संबध असून,मला धमकी देण्यासाठी बुधवारी एका महिलेचा फोन आला. ती महिला बोलताना मी त्याची पत्नी आहे, असे सांगून मला धमकावत होती, असे पीडित महिलेने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...