आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एफडीए’ने पकडला तीन लाखांचा गुटखा, जिल्ह्यात नऊ ठिकाणी टाकल्या एकाच दिवशी धाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरात जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्री सुरू आहे, मात्र ‘एफडीए’कडून गुटखा विक्रेत्यांविरुद्ध समाधानकारक कारवाई होत नसल्याचा आरोप सर्वच स्तरातून सुरू होता. यातच महिनाभरापूर्वी महसूल विभागाने एकाच ठिकाणाहून तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या कारवाईनंतर ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दरम्यान या कारवाईनंतर तब्बल महिनाभराने अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५) जिल्ह्यात नऊ ठिकाणी धाड टाकून लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा सुंगधित सुपारी जप्त केली आहे.

गुटख्यासह अन्य प्रतिबंधित पदार्थांची विक्री होवू नये, यासाठी ‘एफडीए’ कार्यरत आहे. असे असले तरी मागील काही दिवसांच्या कारवाई लक्षात घेता ‘एफडीए’च्या परिणामकारक कारवाई गुटखा विक्रेत्यांवर झालेल्या नाही. शाळांच्या परिसरात सर्रास गुटखा विक्री सुरू असून त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थी मनावर होत असल्यामुळे गुटखा विक्रेत्यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी काही पालकांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे केली होती. तसेच आठवड्यापुर्वी आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाभरात गुटखा गोदाम विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली.यामध्ये दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे वरूड या शहरात कारवाई झाली आहे. दर्यापूरमध्ये तीन ठिकाणी धाड टाकून १९ हजार ८३० रुपयांचा, अंजनगाव सुर्जी येथे१९ हजार १०० रुपयांचा, नांदगाव खंडेश्वर येथे लाख हजार २९ रुपयांचा, चांदूर रेल्वे येथे दोन ठिकाणी धाड टाकून हजार ३५०, वरूडमध्ये दोन ठिकाणाहून ४३ हजार ४१० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई ‘एफडीए’चे प्रभारी सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त मिलींद देशपांडे, एन. आर. ताथोड, व्ही. व्ही. शिंदे, आर. एस. वाकडे, वाय. बी. दहातोंडे, जी. पी. दंदे, प्रविण काळे, एस. एल. सिरोसिया, जी. व्ही. मोहोरे, आर. बी. यादव, जी. व्ही. गोरे, एस.जी. घाटोळ या अकोला, यवतमाळ अमरावतीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे, अशी माहिती ‘एफडीए’च्या सूत्रांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...