आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ फायनान्स कंपन्यांना लाखोंचा गंडा,३ अटकेत, कर्जावर दुचाकी घ्यायचे अन् परस्पर विकायचे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील वेगवेगळ्या वाहन विक्रीच्या शोरुममधून फायनांन्सवर नवीन दुचाकी घ्यायची. काही दिवसांनंतरही कर्जाची परतफेड करताच ती दुचाकी परस्पर विकून टाकायची. अशा प्रकारे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल नऊ वेगवेगळ्या फायनांन्स कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. या गोरखधंद्यात सहभागी चौघांपैकी तिघांना शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ५) पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुप प्रकाश नेरकर (रा. गजलविहार, अमरावती),राजेश बबन साबळे (रा. महादेवनगर, अमरावती) आणि शेख असलम शेख कदिर (रा. नमुना) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याचवेळी त्यांचा सहकारी प्रकाश नाभाराव चंदनकर (३०, रा. भातकुली) याच्याविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. या चौघांपैकी अनुप राजेश हे दोघे दुचाकींची खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या शोरुममध्ये जायचे. नवीन दुचाकी विकत घेण्यासाठी फायनांन्स घ्यायचे. या दोघांनी मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये श्रीराम, मास, फमिली क्रेडीट लिमिटेड, साई पॉइंट, हिंदुजा, इन्डूस्लॅन्ड, एचडीएफसी, बजाज आणि बेरार या नऊ फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन तब्बल आठ दुचाकी, एक एलईडी एक फ्रीज घेतला होता. या दोघांनी घेतलेल्या दुचाकी, फ्रीज एलइडीची विक्री शेख असलम राजेश साबळे हे करत होते. मास फायनांन्स कंपनीचे गोपाल ज्ञानेश्ववरराव तुरणकर (२७ रा. रविनगर) यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

तीन दुचाकी केल्या जप्त
कर्ज काढून नवीन दुचाकी घ्यायची. फायनान्स कंपनीला कर्जाच्या हप्त्याची परतफेकड करता ती दुचाकी परस्परच दुसऱ्याला अर्ध्या किमतीत विक्री करायची, असा यांचा व्यवसाय होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आठपैकी तीन दुचाकी जप्त करून आणल्या आहेत. उर्वरीत दुचाकींचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे पीआय अनिल किनगे यांनी सांिगतले.
बातम्या आणखी आहेत...