आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरबळीचा प्रयत्न; आश्रमशाळा संचालकांना त्वरित अटक करा,आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- धामणगाव रेल्वे तालक्यातील पिंपळखुटा येथील श्री संत शंकर बाबा महाराज विद्यामंदिर आश्रमशाळेत नरबळीसाठी ११ वर्षीय निष्पाप विद्यार्थी प्रथमेश सगणेच्या (रा. अमरावती) गळ्यावर ब्लेडचे वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न वसतिगृहाच्या कंत्राटी स्वयंपाक्याने केला. सध्या हा विद्यार्थी नागपुरात मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी आश्रम शाळेच्या जबाबदार संचालकांना अटक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र सोशल फ्रन्टने जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनादरम्यान केली.
पिंपळखुटा येथील अनुदानीत आश्रम शाळेतील या घृणीत प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, अशी मागणीही िनवेदनात करण्यात आली. प्रथमेश सध्या नागपुरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तेथे त्याला पुरेशी सुरक्षा पुरवण्यात आली नाही. कोणीही त्याला जाऊन भेटतात. त्यामुळे त्याच्या बालमनावर आघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा त्याला पुरेशी सुरक्षा पुरवण्यात यावी. प्रथमेशच्या गरीब कुटुंबीयांना त्याच्या उपचारासाठी १० लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणीही ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी गणेश मापले यांनी केली. गत काही महिन्यांआधी याच आश्रम शाळेतील एका बालकाचे अपहरण करण्यात आले होते.
तो प्रकारही नरबळीचाच असू शकतो असा संशय व्यक्त केला जात आहे. असे गंभीर प्रकार जर या आश्रमशाळेत घडत असतील तर त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून येते. येथील विद्यार्थ्यांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, यासह हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जावे, गृहपाल कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. या प्रकरणी सगणे कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या प्रसंगी समितीचे सदस्य गणेशदास गायकवाड, गोपाल प्रधान, गणेश कलाने, नामदेव खंडारे, संतोष पानबुडे आदी उपस्थित होते.

धामणगाव रेल्वे पिंपळखुटा येथील श्री संत शंकर बाबा महाराज विद्यामंदिरातील प्रथमेश सगणे या पाचवीच्या विद्यार्थ्याच्या हत्या करण्याच्या प्रयत्नातील सुरेंद्र मराठे, नीलेश उईकेसह एका अल्पवयीन आरोपीला अमरावती येथील न्यायालयाने १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती मंगरूळ दस्तगीर येथील ठाणेदार शैलेश शेळके यांनी दिली. धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज विद्यामंदिरातील पाचव्या वर्गात शिकत असणाऱ्या प्रथमेश सगणे याची काळी विद्या शिकण्यासाठी आरोपींनी हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींना रविवारी अटक केली. आरोपींना अटक केल्यानंतर तिनही आरोपींना सोमवारी (दि. १५) अमरावतीच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपींची १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
बातम्या आणखी आहेत...