आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एक नरबळी देण्याचा प्रयत्न उघडकीस, पिंपळखुटा आश्रमशाळेतील विद्यार्थी भयभीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे- तालुक्यातील पिंपळखुटा येथील संत शंकर महाराज आश्रम शाळा येथील नरबळी प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र मराठे याने काही दिवसांपूर्वी आश्रमशाळेतील अजय वनवे नामक विद्यार्थ्यांचा गळा चिरून खूनाचा प्रयत्न केला होता,अशी धक्कादायक बाब तपासादरम्यान समोर आली असल्याची माहिती एसडीपीओ श्रीनिवास घाडगे एपीआय शैलेश शेळके यांनी दिली आहे.

ऑगस्ट रोजी प्रथमेश सगणे या पाचवीतील विद्यार्थ्यावर वसतिगृहातील स्वयंपाकी अन्य दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून नरबळी देण्याच्या उद्देशाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही गोष्ट ताजी असतानाच याच वसतिगृहात शिकणाऱ्या चांदूर रेल्वे तालुक्यातील धानोरा येथील अजय सुनील वनवे (११) नामक विद्यार्थ्यावर ३० जुलैच्या रात्री दहाच्या सुमारास वसतिगृहात झोपला असताना आरोपी मराठेने तीक्ष्ण शस्त्राने वार करून नरबळीचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार अजयची आई किरण वनवे यांनी मंगरूळ दस्तगीर पोलिसात दाखल केली आहे.

..तर प्रथमेशवर ही वेळ आली नसती
आश्रम शाळेत असे भयावह प्रकार होत असतानाही वसतीगृह व्यवस्थापनाला याची साधी माहितीही असू नये याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून प्रकरण दडपण्याचा तर हा प्रकार नाही अशी चर्चाही नागरिकांमध्ये दिसून येत आहे. अजयच्या वेळीच या प्रकरणाची दखल घेतली गेली असती, तर आज प्रथमेशवर मृत्यूशी झुंज देण्याची वेळ आली नसती असा संतापही पालकांसह नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...