आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला, अमरावतीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील यशोदागर भागातील फॉरेस्ट कॉलनी परिसरात गुरूवारी (दि. १८) सायंकाळी तिघांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी युवकावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन हल्लेखोरांना गुन्हे शाखेने घटनेनंतर अवघ्या तासाभरात ताब्यात घेतले आहे.

आदेश विलास मेटांगे (१८, रा. सामरानगर, अमरावती) असे जखमी युवकाचे नाव आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने समीर सुनील निकोसे (२१ रा. यशोदानगर) आणि त्याच्याच १७ वर्षीय सहकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. समीर निकोसे आणि आदेशच्या चुलत भावाचे मागील दोन ते चार महिन्यांपासून वाद सुरू आहेत. गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान यांच्या दोन गटात प्रशांतनगर बगिच्याजवळ वाद झाला. मात्र त्यावेळी दोन्ही गटातील युवक आपाआपल्या घरी गेले. मात्र सायंकाळी वाजताच्या सुमारास आदेश फॉरेस्ट कॉलनीमध्ये असताना समीर निकोसे त्याचे दोन सहकारी त्या ठिकाणी आलेत. तुम्ही आता आमच्या गटात राहीले नाही, तुमचा गट वेगळा झाला आहे, असे बोलून तलवार काढली आणि आदेशवर तलवारीने वार केले. या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या आदेशला उपस्थित नागरिकांनी तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल केले. दुसरीकडे हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिस तातडीने इर्विनला रवाना झाले. तसेच आदेशच्या नातेवाईक परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. दुसरीकडे हल्लेखाेर पसार झाल्यामुळे गुन्हे शाखेचे एपीआय अतुल वर त्यांची चमू या हल्लेखोरांचा शोध घेत होती. दरम्यान सायंकाळी वाजताच्या सुमारास तपोवन परिसरात हल्लेखोर असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिस तपोवन भागात गेले, त्यावेळी पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. याचवेळी तिसरा हल्लेखोर पसार असून त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आदेश हा नरसम्मा हीरय्या महाविद्यालयात शिकत असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बातम्या आणखी आहेत...