आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ महिन्यांत १९८ दुचाकींची चोरी, त्यापैकी ३१ केल्या जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून मागील आठ महिन्यांत १९८ दुचाकींची चोरी झाली असून, शहर पोलिसांनी आतापर्यंत ३१ दुचाकी जप्त केल्या आहेत. ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या एका दुचाकी चोरट्याला शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाच दिवसांपूर्वी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी रविवारी (दि. ४) सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. अजूनही काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता शहर पोलिसांनी वर्तवली आहे.

सै. नईम सै. अनिस (२२ रा. कापूसतळणी, अंजनगाव सुर्जी) असे दुचाकी चोरट्याचे नाव आहे. सै. नईम याला यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते. त्याच्याकडून ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या काही दुचाकी जप्त करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. दरम्यान, शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चांदूर बाजार पोलिसांच्या ताब्यातून त्याला घेतले. त्याने कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले होते. सदर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पीएसआय अय्युब शेख करत आहे. सै. नईमला विचारपूस केली असता त्याने शहरातून दुचाकी चोरल्याची कबूली दिली होती.

शहर पोलिसांनी त्याच्याकडून आतापर्यंत सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकींमध्ये काही दुचाकींचे चेसिस क्रमांक खोडतोड केलेले आहे.

या सहा दुचाकींची किमत जवळपास दीड लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल किनगे, पीएसआय अय्युब शेख, युसूफ सौदागर, जितेंद्र थोरात, देवेंद्र कोठेकर, सचिन कारंजकर, योगेश काटकर यांनी केली आहे.

आणखी दुचाकी जप्त होणार
पोलिस आयुक्तालयाच्याहद्दीतून चोरी गेलेल्या दुचाकी पैकी सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. अटकेत असलेल्या चोरट्याचा एक सहकारी पसार असून त्याचा शोध सुरू आहे. त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडूनही काही दुचाकी जप्त होण्याची शक्यता आहे. -अनिल किनगे,पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा.

दुचाकी चोरी उघड करण्याचे प्रमाण १५%
जानेवारी ते ऑगस्ट २०१६ या आठ महिन्यांत आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरट्यांनी १९८ दुचाकी चोरून नेल्या आहेत. त्यापैकी केवळ ३१ दुचाकी शहर पोलिसांनी आतापर्यंत उघड केल्या आहे. दुचाकी उघड करण्याचे हे प्रमाण केवळ १५.६५ टक्के आहे. यावरून शहर पोलिसांची कामगिरी दिसून येते.

गुन्हे शाखेने जप्त केलेल्या दुचाकींचे वर्णन
दुचाकीक्रमांक रंग

एमएच२७ - ७२८८ (काळा निळा पट्टा)पॅशन प्लस
एमएच३० - टि ३९० (काळा निळा पट्टा)स्प्लेंडर
एमएच२७ - एपी७०५९ (काळा)पॅशन प्रो
एमएच२७ - टि ७८१४ (सिल्व्हर पिवळा पट्टा)स्प्लेंडर
एमएच१९ - आर १२५६ (काळा निळा पट्टा) स्प्लेंडर
एमएच२७ - एक्यू ११८५ (काळा निळा पट्टा)स्प्लेंडर
बातम्या आणखी आहेत...