आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुसऱ्या रॅलीत गेल्याने तलवारीने हल्ला,मारेकऱ्याला २२ ऑगस्टपर्यंत कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- स्वातंत्रदिनी दुसऱ्या गटाने काढलेल्या रॅलीत आदेश मेटांगे हा युवक सहभागी झाल्यामुळेच त्याच्यावर तलवारीने हल्ला झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

यशोदानगर भागातील फॉरेस्ट कॉलनी परिसरात आदेश विलास मेटांगे या १७ वर्षीय युवकावर दिवसांपुर्वी तिघांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात आदेश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आदेशवर हल्ला करणाऱ्या तिघांपैकी पोलिसांनी दोघांना पकडले होते. त्यापैकी एक जण अल्पवयीन असल्यामुळे त्याला पोलिसांनी सोडले आहे. तर एक जण अटकेत आहे त्याला २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आदेशवर हल्ला करणारा मुख्य मारेकरी समीर सुनील निकोसे (२१, रा. यशोदानगर) असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्यांना नुकतीच मिसरुड फुटली आहे, अशा युवकांचे गट (टोळी) यशोदानगर भागात आहेत. असाच एक गट समीर निकासेचा आहे. अन्यही गट असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे येत आहे. आदेश हा पुर्वी समीरच्याच गटाचाच सदस्य होता. मात्र काही दिवसांपासून तो अन्य गटात वावरत होता. १५ ऑगस्टला समीरच्या गटाने रॅली काढली मात्र आदेश त्याच्या गटाने काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी झाला नाही. तर अन्य गटाच्या रॅलीमध्ये गेला. त्यामुळे समीर त्याच्या दोन सहकाऱ्यांनी आदेशला ‘टपकवण्याचा’ प्लॅन आखला. दरम्यान घटनेच्या दिवशी आदेशला फोन करून फॉरेस्ट कॉलनी परिसरात बोलवण्यात आले. आणि त्याच ठिकाणी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली तर अन्य एक जण अजूनही पसार आहे. अटकेतील समीरला शनिवारी पोलिस उपायुक्त मीना यांच्यापुढे हजर केले होते.

तरटळू शकतात घटना : यशोदानगरभागासह शहरातील अनेक भागामध्ये युवकांच्या हैदोस घालणाऱ्या टोळ्या आहेत. यशोदानगर भागातील एका महाविद्यालयाच्या परिसरात या टोळीच्या युवकांचा वावर असतो. अनेकदा त्यांचा अतिरेकसुध्दा होतो मात्र गस्त घालणारे पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांची हीम्मत दिवसेंदिवस वाढत असून अशा घटनांचा जन्म होत असल्याची चर्चा परिसरात सद्या सुरू आहे. भविष्यात अशा घटनांना रोखण्यासाठी पेालिसांनी शहरात ‘उघड्या’डोळयांनी गस्त घालण्याची गरज आहे, अशी अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...